agriculture news in marathi, 37 lakh tons of sugarcane crush in seven districts | Agrowon

मराठवाड्यात सात जिल्ह्यांत ३७ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील सात जिल्ह्यांतील २१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता.८) ३७ लाख ६० हजार टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ३२ लाख ८१ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सर्व कारखान्यांच्या साखरेचा उतारा सरासरी ८.७३ इतका आहे. सोमवारच्या गाळपात दहा कारखान्यांचा साखर उतारा दहाच्या पुढे आला होता.

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील सात जिल्ह्यांतील २१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता.८) ३७ लाख ६० हजार टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ३२ लाख ८१ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सर्व कारखान्यांच्या साखरेचा उतारा सरासरी ८.७३ इतका आहे. सोमवारच्या गाळपात दहा कारखान्यांचा साखर उतारा दहाच्या पुढे आला होता.

खानदेशातील धुळे वगळता नंदुरबार व जळगावमधील पाच साखर कारखान्यांनी यंदा उस गाळपात सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तीन व जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ४ लाख ३८ हजार ६५६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ८९ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.८८ टक्‍के इतका राहिला. सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा उतारा १०.८२ इतका राहिला. जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी २ लाख २९ हजार ५६० मेट्रिक टन उसाचे गाळप करताना १ लाख ८७ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. दोन्ही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.१८ टक्‍के इतका राहिला. सोमवारी संत मुक्‍ताबाई शुगर अँड एनर्जीचा साखर उतारा १०.८३ टक्‍के इतका राहिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ६ लाख ५२ हजार टन उसाचे गाळप करत ५ लाख ६५ हजार १२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. चारही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.६६ टक्‍के इतका राहिला, तर सोमवारी मुक्‍तेश्वर शुगर्सचा साखर उतारा १०.२८ टक्‍के राहिला.

जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखाने यंदा गाळपासाठी उतरले आहेत. या पाचही साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ९ लाख १८ हजार ५१६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८ लाख ८ हजार ८२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.८१ टक्‍के राहिला. सोमवारी पाचपैकी चार कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्‍क्‍यांच्याही पुढे राहिला.

बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. त्यामध्ये पाच सहकारी तर दोन खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत सातही कारखान्यांनी १५ लाख २० हजार टन उसाचे गाळप करत १३ लाख ३० हजार १९० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

सातही  कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्‍के इतका राहिला असून सोमवारी सातही साखर कारखान्यांचा सरासरी उतारा १०.४९ टक्‍के इतका राहिला होता. जय महेश एनएसएल व येडेश्वर शुगर या दोन साखर कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्‍यांपुढे होता, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...