नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ३७४ कोटी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात ८४ हजार ३७४ शेतकऱ्यांना ३७४ कोटी ३२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ कऱ्हे यांनी सांगितले. प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत २८ हजार ७८ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेवटच्या पात्र शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील, असेही कऱ्हे यांनी सांगितले.

कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने उलटले तरी खात्यांवर रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुरवातीला पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन लिस्टमध्येच तांत्रिक दोष निर्माण झाल्याने खरोखरच कर्जमाफीचा लाभ मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला.

पहिल्या ग्रीन लिस्टमध्ये अवघ्या ८७८ शेतकऱ्यांचाच समावेश केला गेला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बॅंका तसेच शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती. त्यातच जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी आणि ओखी वादळाचा तडाखा बसल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करत विरोधकांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न यातून केल्याचे दिसून येते.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अंतर्गत १ लाख ३८ हजार सभासद शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली. या योजनेअंतर्गत ७८ हजार ७५४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ३३३ कोटी २४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. यात नियमानुसार कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५१ हजार ८१७ लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांत २८४ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. यात पुनर्गठन झालेल्या शेतकरी सभासदांनादेखील लाभ मिळाला आहे. जिल्हा बॅंकेच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे, अशा २६ हजार ९३७ सभासदांना ४८ कोटी ७५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com