सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८ कोटींचे वाटप

खरीप नुकसानीपोटी ३८ कोटींचे वाटप
खरीप नुकसानीपोटी ३८ कोटींचे वाटप

सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८ कोटी ७ लाख रुपयांची दुष्काळ मदत जमा करण्यात आली. जिल्ह्यातील ९५२ गावांपैकी ६०३ गावांच्या याद्या तयार आहेत. उर्वरित गावांच्या याद्या चार दिवसांत तयार करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. 

या मदतीच्या वाटपासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर खास मोहीम राबवून काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ही मदत वेळेत आणि तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात ११ हजार ५७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८० लाख, अक्कलकोट तालुक्‍यात ५५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ कोटी ७१ लाख, माढा तालुक्‍यात १० हजार ५५० शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ३६ लाख, करमाळा तालुक्‍यात १० हजार ६२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ५४ लाख रूपये जमा करण्यात आले.

याबरोबरच पंढरपूर तालुक्‍यात ३७७२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ४८ लाख, मोहोळ तालुक्‍यात ६७४७  शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ६१ लाख, मंगळवेढा तालुक्‍यात ८ हजार ६०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी २८ लाख, सांगोला तालुक्‍यात ९ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ कोटी ८५ लाख, माळशिरस तालुक्‍यात ९ हजार ३८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com