agriculture news in marathi, 399 post related to agriculture vacant in jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे रिक्त
चंद्रकांत जाधव
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संबंधित वर्ग १ ते वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांची तब्बल ३९९ पदे रिक्त आहेत. एकूण एक हजार ७१ पदे मंजूर आहेत. या पैकी केवळ ६७२ भरलेली असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर वाढला आहे.

प्रमुख पदांमध्ये गणले जाणारे कृषी उपसंचालकपद वर्षभरापासून रिक्त आहे. सध्या वसुंधरा पाणलोटचे व्यवस्थापक अनिल भोकरे यांच्याकडे या पदाचा कार्यभार आहे. वर्ग २ संवर्गातील तंत्र अधिकारी यांची सात पदे मंजूर असून, यातील एक पद रिक्त आहे. प्रशासन अधिकारीचे एक पद मंजूर असून, हे पदही रिक्त आहे.

तालुका कृषी अधिकारी यांची १३ पैकी २ पदे रिक्त आहेत. वर्ग २ (कनिष्ठ) श्रेणीमधील कृषी अधिकारी यांची २१ पदे मंजूर असून, यातील सात पदे रिक्त आहेत. तर मंडळ कृषी अधिकारी यांच्या ३८ पैकी १७ जागा रिक्त आहेत. वर्ग तीन संवर्गातील कृषी पर्यवेक्षकांच्या १११ जागा मंजूर असून, यातील ४१ जागा रिक्त आहेत. कृषी सहायकांच्या ४१५ जागा मंजूर आहेत. यातील १२२ जागा रिक्त आहेत.

कार्यालय अधीक्षकाच्या दोन्ही जागा रिक्त असून, सहायक कार्यालय अधीक्षकांच्या १४ पैकी चार जागा रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिकच्या २४ पैकी १० जागा रिक्त असून, लिपिकांच्या ७२ पैकी २२ जागा रिक्त आहेत. लघुलेखकाची एक जागा मंजूर असून, ही जागाही रिक्त आहे. वर्ग तीन संवर्गात एकूण ८२४ जागा मंजूर असून, यातील २७६ पदे रिक्त आहेत. तर वर्ग चार संवर्गातील १५७ पैकी ८७ जागा रिक्त आहेत.

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...