नाशिक विभागात तीन महिन्यांत ४० बिबट्यांनी गमावले प्राण

नाशिक विभागात तीन महिन्यांत ४० बिबट्यांनी गमावले प्राण
नाशिक विभागात तीन महिन्यांत ४० बिबट्यांनी गमावले प्राण

अंबासन : नाशिक विभागाचे वनक्षेत्र पाच हजार १५९.२६५ चौरस किलोमीटर आहे. वनक्षेत्रात मानव व वन्यजीव हा संघर्ष सुरू असतो. पाच वर्षांच्या कालावधीत कार्यक्षेत्रात जंगली व रानटी जनावरांच्या हल्ल्यात १८ जण मृत्युमुखी पडले. ९१ जण किरकोळ व गंभीर स्वरूपात जखमी झाले. वन्यप्राणी व मानवी संघर्षात अवघ्या तीन महिन्यांत चाळीस बिबटे ठार झाले.

वन विभागातर्फे जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी ६९ लाख ४४ हजार ९४० रुपये मदत देण्यात आली. यात प्रामुख्याने बिबट्यांचा अन्नपाण्याच्या शोधात नागरी वस्तीतील वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. विविध ठिकाणांहून बिबट्यांसाठी पिंजरे लावण्याच्या मागण्या पुढे आल्या. वन्यप्राणी व मानवी संघर्षात अवघ्या तीन महिन्यांत चाळीस बिबटे ठार झाले. पिंजरे मागणीची पूर्तता करताना वन विभागाच्या नाकीनऊ येऊ लागले.

तळवाडे शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उकिरडे असतील तेथे या प्राण्यांची संख्या अधिक असते. कुत्र्यांची संख्या रोडावली की बिबट्या कुत्र्यांच्या शोधात मानवी वस्तीत जाऊन तेथे मोकाट व मध्यम आकाराच्या पाळीव जनावरांना शिकार बनवतो. अशा हल्ल्यातही वाढ होत आहे. नाशिक विभागात बागलाण व निफाड तालुक्‍यात बिबट्याचा वावर वारंवार आढळून आला. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात वनपरिक्षेत्रातील जंगल अवैध वृक्षतोडीमुळे उजाड झाले.

अपवादात्मक काही गावे वगळता वृक्षारोपण मोहीम कागदावरच रहिली. यामुळे वन्यप्राण्यांनी गावाकुसाकडे आपला मोर्चा वळविला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १८ पैकी बहुसंख्य जणांचे वास्तव्य शेतशिवारात होते. जनावरांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर व त्यांची बालके जखमी झाली. या संघर्षात गेल्या तीन महिन्यांत वन विभागात चाळीस बिबटे मरण पावल्याची धक्कादायक माहिती वन विभागाकडून मिळाली. नैसर्गिक व रस्ता अपघातात दोन बिबटे मृत्युमुखी पडले. नाशिक, कळवण, येवला, चांदवड, उंबरठाण या ठिकाणी आठ बिबटे मरण पावल्याची नोंद आहे.

आकडे बोलतात...

  •  तीन महिन्यांत वनवृत्तात बिबटे मृत संख्या : ४०
  •  बिबट्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांत जखमी : ९१
  •  पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात मृत : १८
  •  वन विभागातर्फे मदतवाटप : १ कोटी ६९ लाख ४४ हजार ९४० रुपये
  •  वन विभागनिहाय वनक्षेत्र : ३७  परिमंडळ संख्या : ११५
  •  नियतक्षेत्र संख्या : ३९५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com