agriculture news in marathi 40 sand ghats will stop in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील ४० वाळू घाट होणार बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018
नाशिक  : वाळू घाटावरील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कडक वाळू धोरण तयार केले आहे. यामध्ये ५०० मीटर अंतरावर महामार्ग-पूल नसावेत, वाहत्या पाण्याच्या ठिकाणांवरील घाटांचे लिलाव करू नये, असे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ५२ पैकी ४२ घाट बसत नसल्याने ते कायमस्वरूपी बंद करावे लागणार आहेत. संबंधित घाट बंद होणार असल्याने भविष्यात वाळूची टंचाई निर्माण होणार आहे. तसेच मि‍ळणाऱ्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
नाशिक  : वाळू घाटावरील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कडक वाळू धोरण तयार केले आहे. यामध्ये ५०० मीटर अंतरावर महामार्ग-पूल नसावेत, वाहत्या पाण्याच्या ठिकाणांवरील घाटांचे लिलाव करू नये, असे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ५२ पैकी ४२ घाट बसत नसल्याने ते कायमस्वरूपी बंद करावे लागणार आहेत. संबंधित घाट बंद होणार असल्याने भविष्यात वाळूची टंचाई निर्माण होणार आहे. तसेच मि‍ळणाऱ्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
वाळू घाटांवरील पर्यावरणाचे निकष पाळले जात नसल्याने गतवर्षी डिसेंबरमध्ये न्यायालयाने घाटांच्या लिलावावर बंदी घातली. गेल्या मार्चमध्ये सरकारने वाळू घाटांच्या धोरणातच बदल केले. नवीन धोरणानुसार घाटांच्या लिलावापूर्वी तेथील ग्रामपंचायतींची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने वाहते पाणी असलेल्या पात्रांमधील घाटांच्या लिलावरच बंदी घातली आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेदेखील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेपासून ५०० मीटरच्या आतील घाटांच्या लिलावाला परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे गोदावरीचा प्रवाह कायम वाहता असल्याने त्र्यंबकेश्‍वर, नाशिक व निफाड तालुक्यातील नदीवर असलेले घाट देखील बंद होणार आहेत.
मुळातच गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील घाटांचे लिलाव हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ही प्रक्रिया किचकट व वेळकाढू आहे. त्यातच तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यातील वाळूची प्रतिवारी पूर्वीसारखी राहिलेली नाही. परिणामी लिलावाला वाळू ठेकेदारांचा फारसा प्रतिसाद लाभत नाही. गतवर्षी चार घाटांसाठी तीनदा लिलाव प्रक्रिया बोलविल्यानंतर गौणखनिज विभागाला २३ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. वाळू घाटांसाठी लावण्यात आलेल्या पर्यावरणाच्या निकषातून ४२ घाट बाद ठरल्याने उर्वरित १० घाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रशासनाला समाधान मानावे लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...