agriculture news in marathi, 40 thousand demand for transformer from farmers | Agrowon

रोहित्रांसाठी शेतकऱ्यांकडे चाळीस हजारांची मागणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

अंबासन, जि. नाशिक : तालुक्‍यात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, बागलाण पंचायत समितीत ग्रामस्थांची वीज वितरणकडून होणारी लूट पंचायत समितीच्या सदस्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. तालुक्‍याचे कार्यकारी अभियंता अनिल उइके यांना बोलवून नेमक्‍या कोणत्या वरिष्ठांना पैसे पोचवले जातात, याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

अंबासन, जि. नाशिक : तालुक्‍यात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, बागलाण पंचायत समितीत ग्रामस्थांची वीज वितरणकडून होणारी लूट पंचायत समितीच्या सदस्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. तालुक्‍याचे कार्यकारी अभियंता अनिल उइके यांना बोलवून नेमक्‍या कोणत्या वरिष्ठांना पैसे पोचवले जातात, याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

तालुक्‍यातील करंजाडी खोऱ्यातील निताणे गाव सोळा दिवसांपासून अंधारात आहे. याच गावातील शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून शेतीसाठी नव्याने पाच रोहित्रे बसविली आहेत. संबंधित ठेकेदारामार्फत संपूर्ण काम झाले असतानाही आजतागायत वीजपुरवठा सुरू झालेला नाही. या प्रत्येकी रोहित्रामागे चाळीस हजार रुपयांची संबंधित अधिकाऱ्यांकडून मागणी होत असल्याचे पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार यांनी सांगितले.

याबाबत पंचायत समिती बागलाण येथे तातडीने बैठक बोलवून तालुक्‍याचे कार्यकारी अभियंता अनिल उइके यांना बोलविण्यात आले व सर्व हकीगती सदस्यांनी त्यांना सांगितल्या. आपण या सर्व गोष्टींबाबत अनभिज्ञ असून, कुठलीही कल्पना नसल्याचे श्री. उइके यांनी सांगितले. विजेच्या कोटेशनसाठी फक्त पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च येत असतानाही संबंधित अधिकारी पंचवीस ते तीस हजार घेत आहेत. याबाबत कोणीही विचारणा केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हे पैसे पोचवावे लागतात, असे उत्तर दिले जाते.

अनेक शेतकऱ्यांनी वीजपंपांची तीन हजार रुपये देयके दिली असतानाही त्यांना बिलाची पावतीच दिली गेली नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी तोंडाने पैशांची मागणी करीत असल्याचे या वेळी बैठकीत पंचायत समितीच्या उपस्थित सदस्यांनी सांगितले. संबंधित मुजोर अधिकाऱ्याची दोन दिवसांत उचलबांगडी न केल्यास पंचायत समितीचे सर्व सदस्य तालुक्‍यातील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे पंचायत समितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.

गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मासिक मीटिंगमध्ये ठराव मांडण्यात आल्याचे सांगितले. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची चालवलेली लूट थांबवावी अन्यथा वीज वितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  बैठकीत अतिरिक्त गटविकास अधिकारी महेंद्र कोर, सभापती विमल सोनवणे, उपसभापती शीतल कोर, सदस्य वसंत पवार, माणिक आहिरे, वैशाली महाजन, कान्हू आहिरे, अतुल आहिरे, संजय जोपळे, ज्योती आहिरे, कल्पना सावंत, रामदास सोनवणे, जिभाऊ कोर, पंडित आहिरे, दादाजी महाजन उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...