agriculture news in marathi, 40 water tankers in Satara District | Agrowon

सातारा जिल्ह्यात ४० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

सातारा : जिल्ह्यात माॅन्सूनची दमदार हजेरी लागली असली तरी टॅंकरच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत टॅंकरच्या संख्येत तीनने घट होऊन ४० वर आली आहे. सध्या जिल्ह्यात ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सातारा : जिल्ह्यात माॅन्सूनची दमदार हजेरी लागली असली तरी टॅंकरच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत टॅंकरच्या संख्येत तीनने घट होऊन ४० वर आली आहे. सध्या जिल्ह्यात ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात माॅन्सूनने दमदार हजेरी लावली असली तरी टंचाईग्रस्त गावे अजूनही कोरडीच आहेत. यामुळे या गावातील जनतेस अजून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवरची विसबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील फलटण व सातारा या तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर सर्व नऊ तालुक्‍यांतील काही गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यात ४० टॅंकरद्वारे ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवरील ६१ हजार २२४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. यमाध्ये सर्वाधिक जावली तालुक्‍यात १२ टॅंकरद्वारे ९ गावे व १० वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ माण तालुक्‍यात नऊ टॅंकरद्वारे १४ गावे ८४ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्‍यात सहा टॅंकरद्वारे आठ गावे २८ वाड्यावस्त्यांवर, कोरेगाव तालुक्‍यात सहा टॅंकरद्वारे आठ गावांत, खंडाळा तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे एका गावात, वाई तालुक्‍यात दोन टॅंकरद्वारे दोन गावे एका वाडीवस्तीवर, महाबळेश्‍वर तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे सात गावे व तीन वाड्यावस्तीवर, तर कराड तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे दोन गावे व दोन वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...