सांगली जिल्ह्यात शेतीपंपांचे ४०० कोटींचे वीजबिल थकीत

शेतीपंपांचे ४०० कोटींचे वीजबिल थकीत
शेतीपंपांचे ४०० कोटींचे वीजबिल थकीत

सांगली : वीजबिलवसुलीत कायम अग्रेसर राहणाऱ्या सांगली जिल्ह्यात मागील तीन वर्षांत शेतीपंपांच्या थकबाकीत अडीच पटीने वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी १३८ कोटी २७ लाख असलेली थकबाकी मार्च २०१७ अखेरीस तब्ब्ल ४०० कोटींच्या घरात पोचली आहे. वीजवसुली लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात २ लाख १५ हजार ९३७ शेतीपंपधारक आहेत. त्यातील दोन लाखांहून अधिक थकबाकीत आहेत; तसेच १ लाख १५ हजार २४३ ग्राहकांकडे दहा हजारांहून अधिक थकबाकी आहे. ती साडेतीनशे कोटींहून अधिक आहे.  वसुली अवघड बनल्याने महावितरणला सवलत योजना सुरू करणे भाग पडले आहे. त्यासाठी हप्ते पाडून देण्याची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना या नावाने ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी एप्रिल २०१७ नंतरची चालू त्रैमासिक वीजबिले तातडीने भरावी लागणार आहेत. वीजबिल न भरल्यास शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. या योजनेत दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च २०१७ अखेर ३० हजारांपेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकीचे पाच समान हप्ते दिले जाणार आहेत. प्रत्येक हप्ता २० टक्के रकमेचा आहे. पहिला हप्ता डिसेंबर, दुसरा मार्च २०१८, तिसरा जून, चौथा सप्टेंबरला तर पाचवा हप्ता डिसेंबरपर्यंत भरावा लागणार आहे.  या प्रत्येक हप्त्यांसोबत पुढील काळात येणारे चालू बिल भरणेही क्रमप्राप्त आहे. तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी १० टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत. संपूर्ण हप्ते व चालू बिलाचा भरणा डिसेंबर २०१८ पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर दंड व व्याज माफ करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com