शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी घेतला सहभाग

शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी घेतला सहभाग
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी घेतला सहभाग

औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांत पणन मंडळाच्या शेतीमाल तारण योजनेला प्रतिसाद मिळाला आहे. तीनही जिल्ह्यांतील ४०६ शेतकऱ्यांनी दर पडलेले असताना पणन मंडळाच्या शेतीमाल तारण योजनेअंतर्गत आपला १६ हजार ९७७ क्‍विंटल शेतीमाल तारण ठेवून त्यामाध्यमातून कर्ज उचल करून आपली गरज भागविणे पसंत केले आहे. बाजार समित्या आणि पणन मंडळाचा समन्वय त्यासाठी कामी आला आहे.

आपला शेतीमाल पडलेल्या दरात विकण्याऐवजी आपली गरज भागविण्यासाठी तोच शेतीमाल तारण ठेवून त्यावर कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शासनाच्या शेतीमाल तारण योजनेला प्रतिसाद मिळाला नसला तरी जालना, परभणी व हिंगोली या औरंगाबाद पणन मंडळांच्या विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या जिल्ह्यात मात्र शेतीमाल तारण योजनेला प्रतिसाद मिळाला आहे. ५ कोटी ४० लाख रुपयांच्या या शेतीमालावरील बाजार समितीने अदा केलेली रक्‍कम ३ कोटी ८४ लाख ६४ हजार ४७२ रुपये इतकी आहे.

त्यापैकी पणन मंडळाने २ कोटी ४८ लाख ४५ हजार ९१ रुपये प्राप्त प्रस्तावानुसार पणन मंडळाने बाजार समित्यांना प्रतिपूर्ती केली आहे. परभणी बाजार समिती वगळता शेतीमाल तारण योजना राबविण्यासाठी इतर सर्व समित्या पणन मंडळाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. अशा बाजार समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या तारणाच्या प्रस्तावासाठीची रक्‍कम दिली जाणार असल्याची माहिती पणन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

जालना जिल्ह्यातील परतूर, जालना, मंठा, घनसावंगी व अंबड, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व जवळा बाजार, परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, पाथरी, मानवत, जिंतूर आदी बाजार समित्यांमार्फत शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, हळद, तूर, हरभरा आदी शेतीमाल तारण ठेवून त्यावर आपली गरज भागविणेच पसंत केले आहे. 

१६ हजार ७२ क्‍विंटल सोयाबीन सर्वाधिक तारण जालना, परभणी व हिंगोली या तीनही जिल्ह्यांतील शेतीमाल तारण योजनेत सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे सर्वाधिक तारण ठेवण्याला पसंती दिली आहे. तारण ठेवण्यात आलेल्या एकूण १६ हजार ९७७.९३ क्‍विंटल शेतीमालापैकी तब्बल १६ हजार ७२ क्‍विंटल सोयाबीनच शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेत तारण ठेवून त्यावर गरज भागविण्यासाठी कर्ज उचल केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com