agriculture news in marathi, 41/5000 Vaḍāṅgaḷīta ubhāraṇāra 5 mēgāvŏṭacā sōlara prakalpa 5 MW Solar Project to be set up in wadangali | Agrowon

वडांगळीत उभारणार ५ मेगावॉटचा सोलर प्रकल्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे खासगीकरणातून पाच मेगावॉटचा सोलार प्रकल्प उभा करण्यासाठी महाजनकोने प्रस्ताव मागवले आहे. हा प्रकल्प उभा करण्याबरोबरच परिसरातील पाच किमी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणार आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली प्रकल्प उभारणाऱ्यानेच करावी, यासाठी खडांगळीचा ११ केव्हीचा फीडर प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडेच हस्तांतरित करण्यात येणार आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे खासगीकरणातून पाच मेगावॉटचा सोलार प्रकल्प उभा करण्यासाठी महाजनकोने प्रस्ताव मागवले आहे. हा प्रकल्प उभा करण्याबरोबरच परिसरातील पाच किमी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणार आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली प्रकल्प उभारणाऱ्यानेच करावी, यासाठी खडांगळीचा ११ केव्हीचा फीडर प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडेच हस्तांतरित करण्यात येणार आहे.

येत्या दोन वर्षांत सोलार प्रकल्पातून २५० मेगावॉट वीज उत्पादन करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठरवले असून, २०२२ पर्यंत १५००० मेगावॉटचा पल्ला गाठण्याचा सरकारचा मनोदय आहे. सरकारने प्रयत्न करूनही आजपर्यंत संपूर्ण राज्यात केवळ ५०० मेगावॉटचे प्रकल्प उभे करण्यात सरकारला यश आले आहे. एवढा मोठा पल्ला गाठणे एकट्या सरकारला अशक्य असून, खासगी गुंतवणूकदारांना त्यासाठी प्रोत्साहित करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे.

पारंपारिक स्रोतांपासून सध्या वीज ६-७ रुपये प्रतियुनिट दराने सरकार खरेदी करते; अथवा जवळपास त्याचदरम्यान वीज उत्पादनाचा खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना हीच वीज एक ते सव्वा रुपये प्रतियुनिट दराने सरकार अर्थात वीज वितरण कंपनी बांधावर पोचवते.

अपांरपरिक ऊर्जेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांत प्रकल्प उभारून त्या-त्या भागाची गरज भागवण्याचा व खर्च कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी खास मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यभर राबवण्यात येत असून, या योजनेचे पायलट प्रोजेक्ट राळेगणसिद्धी व यवतमाळमध्ये यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात पाच असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत वडांगळीला ५ मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवले आहेत.

या प्रस्तावानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा सरकार उपलब्ध करून देणार असून, प्रकल्पापासून जवळच्या वीज उपकेंद्रापर्यंत वीज पोचवल्यानंतर या उपकेंद्रापासून ठरवलेल्या फीडरपर्यंतच वीज पोचवण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनी घेणार आहे. एक ते सव्वा रुपये युनिटऐवजी शेतकऱ्यांना ३ ते सव्वा तीन रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा व्हावा, अशी सरकारची अपेक्षा असून, या प्रकल्पातून तयार होणारी वीज २४ तास शेतकऱ्यांना उपलब्ध असणार आहे.

वीज बिलाची वसुलीही गुंतवणूकदाराला स्वत:च करावी लागणार असून, आपली गुंतवणूक वसूल करण्यासाठी २०-२५ वर्षांपर्यंत हा प्रकल्प गुंतवणूकदाराकडेच राहणार आहे. या प्रकल्पातील वीज गळती रोखण्यापासून देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची राहणार आहे. शेतकऱ्याने वीजबिल भरले नाही, तर त्याची वीज जोडणी तोडण्याचा अधिकारही संबधित गुंतवणूकदाराला असणार आहे.

२२ ते २५ कोटींची होणार गुंतवणूक

वडांगळी परिसरातील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर येड्या बाभळींचे जंगल उभे राहिले असून, या गायरान जमिनीपैकी २५ एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. सुमारे २२ ते २५ कोटीची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर बातम्या
धानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनसमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध...
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...