agriculture news in marathi, 42 Revenue Recovery for Good Rainfall | Agrowon

नगर जिल्ह्यात चांगल्या पावसाची ४२ मंडळात नोंद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

नगर ः नगर जिल्ह्यामधील बहुतांश भागात शनिवारी (ता. २३) पावसाने हजेरी लावली. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामधील सुमारे ४२ महसूल मंडळांत शंभर मिलिमीटर पेक्षा जास्ती पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची ४९७ मिलिमीटरची सरासरी असून दोन तालुके चाळीस टक्‍क्‍यांच्या पुढे गेले असल्याची प्रशासनाची नोंद आहे. सर्वात कमी पाऊस वडेगव्हाण (ता. पारनेर) महसूल मंडळात झाला आहे.

नगर ः नगर जिल्ह्यामधील बहुतांश भागात शनिवारी (ता. २३) पावसाने हजेरी लावली. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामधील सुमारे ४२ महसूल मंडळांत शंभर मिलिमीटर पेक्षा जास्ती पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची ४९७ मिलिमीटरची सरासरी असून दोन तालुके चाळीस टक्‍क्‍यांच्या पुढे गेले असल्याची प्रशासनाची नोंद आहे. सर्वात कमी पाऊस वडेगव्हाण (ता. पारनेर) महसूल मंडळात झाला आहे.

नगर जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाळा सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसाने पावसाला सुरवात झाली. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पेरण्या, कापूस लागवडीला सुरवात होत आहे. यंदा खरिपात मूग, उडिदाची जास्ती पेरणी होण्याचा अंदाज होता, मात्र पाऊस लांबल्यामुळे आता उडीद, मूगाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज असून कांद्याची लागवड वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत २७.१८ टक्के पाऊस झाला आहे.

गेल्यावर्षी आतापर्यंत ३३.४५ टक्के पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यामध्ये असलेल्या ९७ महसूल मंडळापैकी ४२ महसूल मंडळात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्ती पाऊस झालेला असून जामखेड, खर्डा, जेऊर (ता. नगर) संगमनेर, डोळासणे (ता. संगमनेर), पोहेगाव, सुरेगाव (ता. कोपरगाव) या सात महसूल मंडळात दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्ती पाऊस झाला आहे. शनिवारी सर्वाधिक जेऊर (ता. नगर) महसूल मंडळात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जेऊर भागात त्यामुळे काही घरात पाणी शिरले होते. दरवर्षीच्या तुलनेत मात्र अकोले तालुक्‍याच्या आदिवासी भागात पाऊस कमी आहे.
 

तालुका निहाय पाऊस (टक्के)

अकोले

१७.४२

संगमनेर ५०.१७
कोपरगाव ३७.७१
श्रीरामपूर ३६.८२
राहुरी १७.८०
नेवासा १८.०७
राहाता ३१.३५
नगर १६.४०
शेवगाव ४०.१४
पाथर्डी १८.३४
पारनेर २३.६३
कर्जत १७.८२
श्रीगोंदा २२.५१
जामखेड ३५.६२

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...