तुर उत्पादक शेतकऱ्यांचे ४३ कोटी रुपये रखडले

तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावरील खरेदी केंद्रांवर पोत्यांची थप्पी लागली आहे
तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावरील खरेदी केंद्रांवर पोत्यांची थप्पी लागली आहे

परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. १३) पर्यंत १९ हजार २४२ शेतकऱ्यांकडून २ लाख १८ हजार ८५५.३७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. वखार महामंडळाच्या गोदामात नसल्यामुळे ७९ हजार ७६५ क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे. त्यातच शेतकऱ्यांचे ४३ कोटी ४७ लाख १९ हजार २५० रुपयांचे चुकारे रखडले आहेत. दरम्यान, या तीन जिल्ह्यांत २०९ शेतकऱ्यांचा ३ हजार ३४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील तुरीसाठी नोंदणी केलेल्या ५७ हजार ८८५ पैकी १९ हजार २४२ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जागा नसल्यामुळे अनेक ठिकाणची तूर खरेदी बंद आहे. काही ठिकाणी खासगी गोदाम भाडेतत्त्वावर घेण्यात आले असले तरी जागा कमीच पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील गोदामातील उडीद, सोयाबीन उचलण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होत आहे. परंतु आता हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे तूर खरेदीसाठी अडचणी येणार आहेत.  शुक्रवार (ता. १३) पर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये ११ हजार ४४७ शेतकऱ्यांची १ लाख १६ हजार ७४ क्विंटल, परभणी जिल्ह्यामध्ये ३ हजार ४६४ शेतकऱ्यांची ५६ हजार ४९५ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यामध्ये ४ हजार ३०७ शेतकऱ्यांची ४६ हजार २८४ क्विंटल अशी तीन जिल्ह्यातील एकूण १९ हजार २४२ शेतकऱ्यांची २ लाख १८ हजार ८५५.३७ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. वखार महामंडाळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे ७९ हजार ७६५ क्विंटल खरेदी केंद्रांवरच पडून आहे. हि तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठविली जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. तूर खरेदी केंद्रावरच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांचे ४३ कोटी ४७ लाख १९ हजार २५० रुपयांचे चुकारे थकले आहेत. तूर वाहतुकीवर खर्च धर्माबाद येथे जागा नसल्यामुळे किनवट येथील गोदामात तूर नेण्यात आली. बीड जिल्ह्यातील तूर जवळा बाजार (जि. हिंगोली) येथे साठवली. परभणी येथून बोरी (ता.जिंतूर) येथील तसेच अन्य ठिकाणच्या गोदामात तूर साठविण्यासाठी नेली जात आहे. खरेदी केंद्राच्या ठिकाणापासून दूर अंतरावरील गोदामात तूर नेली जात आहे. परंतु तेथे वखार महामंडळाच्या ग्रेडरनी निकषात न बसणारी तूर नाकारल्यास ती वापस केंद्रांवर आणून चाळणी करून परत गोदामात न्यावी लागत आहे. वाहतुकीवर मोठा खर्च होत आहे. ३३४८ क्विंटल हरभरा खरेदी नांदेड जिल्ह्यात १५१ शेतकऱ्यांची २ हजार ४९९.५० क्विंटल, परभणी जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांची ४९१.५० क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात २१ शेतकऱ्यांची ३५७ क्विंटल अशी एकूण २०९ शेतकऱ्यांची ३ हजार ३४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com