आसाममध्ये पूरस्थितीमुळे ४३ जणांचा मृत्यू

गोलाघाट ः येथील डोयांग नदीला पूर आल्याने संपूर्ण गावच जलमय झाले आहे. गावातील रस्त्यांवरून नागरिकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे.
गोलाघाट ः येथील डोयांग नदीला पूर आल्याने संपूर्ण गावच जलमय झाले आहे. गावातील रस्त्यांवरून नागरिकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे.

गुवाहाटी, आसाम ः आसाममध्ये मागील काही दिवासांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती आली होती. त्यामुळे आसाममधील सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या सहा जिल्ह्यांतील एक लाखाहून अधीक लोकांचे जीवन विस्कळित झाले आहे. तसेच या पूरस्थितीमुळे राज्यात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.   आसाम राज्यातील धेमाजी, लखीमपूर, दारांग, गोलघाट, सिवसागर आणि चारांदेव जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यामध्ये मागील महिनाभरापासून अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे राज्यातील नद्यांना पूर आला. मागील अनेक दिवासांपासून ही पूरस्थिती कायम आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. राज्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. तसेच लाखाहून अधिक लोक या पूरस्थितीमुळे प्रभावित झाले आहेत. गोलाघाट जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले, की डोयांग नदीच्या वरच्या भागात भूस्खलन झाल्याने कृत्रिम तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या डोयांग आणि धानसीरी या नद्यांचे पाणी तळ्यातून लोकवस्तीकडे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथील पूरस्थिती येणाऱ्या काही दिवासांमध्ये आणखी वाढून समस्या निर्माण होऊ शकते.  राज्य सरकारतर्फे पूरस्थिती असलेल्या भागात १३२ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सध्या २३ हजार ५०४ लोकांनी आश्रय घेतला आहे.   शेतीचे नुकसान राज्यात पावसाचे थैमान काही प्रमाणात कमी झाले असले तरीही पूरस्थिती असून कायम आहे. गावात शिरलेले पाणी अजून बाहेर निघालेले नाही, तसेच शेतीही पाण्याखालीच आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या राज्यातील १६३ गावांमध्ये १० हजार ९९१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.   नद्या धोक्याच्या पातळीवर सध्या जोरहाट जिल्ह्यातील निमातीघाट येथे ब्रह्मपुत्रा, गोलघाट येथे धनसिरी नदी आणि सोनितपूर येथे जिया भराली नदीला पूर आला आहे. तसेच चिराग जिल्ह्यातील नद्यांनाही पूर आल्याने शेतीला फटका बसला आहे. गोलघाटमध्ये स्थिती बिकट आसाम राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार गोलघाट जिल्ह्यात पुराची स्थिती सर्वात जास्त बिकट आहे. जिल्ह्यात डोयांग आणि धानसीरी या नद्यांचे पाणी शिरल्याने शेतीलाही तळ्याचे स्वरूप आले आहे. गावात रस्त्यांवर पाणी आल्याने रस्ते नदीमय झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोलाघाट जिल्ह्यातील जवळपास ९१ हजार नागरिक पुराने प्रभावित झाले आहेत. त्यापोठोपाठ लखिमपूर जिल्ह्यात सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com