agriculture news in marathi, 43 farmers suicide cases in bhandara district In 2018 | Agrowon

धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी आत्महत्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी जागृतीचा अभाव या कारणामुळे धानपट्ट्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ४३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असलेल्या या जिल्ह्यात सिंचन सुविधांचादेखील अभाव आहे. परिणामी धानाची उत्पादकतादेखील मर्यादीत राहिली आहे. पर्यायी पीक आणि उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञान मार्गदर्शनात कृषी विभाग मागे पडला. 

भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी जागृतीचा अभाव या कारणामुळे धानपट्ट्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ४३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असलेल्या या जिल्ह्यात सिंचन सुविधांचादेखील अभाव आहे. परिणामी धानाची उत्पादकतादेखील मर्यादीत राहिली आहे. पर्यायी पीक आणि उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञान मार्गदर्शनात कृषी विभाग मागे पडला. 

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यापुढेही शेतकरी कुटुंबासमोरील अडचणी संपल्या नाही. यातील २२ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर २१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे चौकशीअंतर्गत एकही प्रकरण प्रलंबित नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उर्वरित कुटुंबांना मदत मिळणे आता दुरापास्त झाले आहे. 

२०१८ या वर्षात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या १६ वर्षांत ५४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद २०१६ मध्ये झाली. यावर्षी ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते मार्च या कालावधीत एकही शेतकरी आत्महत्या नसल्याचे प्रशासन सांगते.
 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...