agriculture news in Marathi, 43 percent land Limestone affected in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखड
संतोष मुंढे
सोमवार, 22 जानेवारी 2018

सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या सुपिकतेशी संबंधित सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीचे उपाय योजल्यास इतर सर्व अडचणींवर सहज मात करता येणे शक्‍य आहे.
- डॉ. सय्यद ईस्माईल, विभागप्रमुख मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र वनामकृवी परभणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत चालला आहे. सेंद्रिय कर्बाची अनुपलब्धता हे जमिनिचा पोत खालाण्याचे महत्त्वाचे कारण आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरताही त्यामध्ये भर घालते आहे. सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे मराठवाड्याच्या मातीत मोठ्या प्रमाणात असलेल्या चुनखडने डोके वर काढले आहे. 

मराठवाड्यातील एकूण पेरणीयोग्य जमिनीपैकी जास्त खोल काळ्या जमिनी १३%, मध्यम खोल काळ्या जमिनी ६३%, हलक्‍या उथळ जमिनी १४% टक्‍के आहेत. मराठवाड्यातील ४३ टक्‍के जमीन चुनखड असून नांदेड जिल्ह्यात चुनखड जमिनीचे प्रमाण सर्वाधिक ७७ टक्‍के इतके आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या पाच जिल्ह्यांत चुनखडयुक्‍त जमिनीचे प्रमाण ३२ ते ३९ टक्क्यांदरम्यान आहे. तर हिंगोली व जालना जिल्ह्यात ४४ टक्‍के जमीन चुनखड आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखड असलेल्या जमिनीच्या माती नमुन्याचे प्रमाण ८० ते ९० टक्क्‍यांपर्यंत असून जवळपास ३० ते ४० टक्‍के जमिनीचे माती नमुन्यात १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखड असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील ९० टक्‍के माती नमुन्यात नायट्रोजनची कमतरता आढळून आल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

जमिनीचा सामू साधारणपणे ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ टक्‍के माती नमुन्यांचा सामू ७.८ ते ८.३ दरम्यान तर गोदावरीचे बॅकवॉटर व खास करून खांब नदीकाठच्या जमिनीच्या माती नमुन्यात ८.५ च्या वर आढळून आल्याचे श्री. पाटील म्हणाले. मराठवाड्यातील ८२ टक्‍के जमिनी अल्कधर्मीय आहेत. मराठवाड्यातील जमिनीत नत्राचा निर्देशांक १.१७ असून तो गरजेपेक्षा कमीच आहे.

मराठवाड्यातील सरासरी ५२ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता असून जालन्यात सर्वाधिक ६७ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात ५४ टक्‍के, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यात ४६ टक्‍के, लातूर जिल्ह्यात ५२ टक्‍के, औरंगाबाद व बीड जिल्ह्यात ५० टक्‍के तर नांदेड जिल्ह्यातील ४३ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०. ७५ पेक्षा अधिक असल्यास पुरेसे असते; परंतु गेल्या दहा वर्षांत ते ०.५ पर्यंत कमी झाले आहे.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली आहे. पाण्याचा थोडा जरी ताण पडला तरी पिके सुकू लागतात. जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे पिकांना पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत. मराठवाड्याच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, गंधक, जस्त, लोह, बोरॉन या सहा अन्नद्रव्यांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.

जमिनीतून अन्नद्रव्यांचा उपसा वाढला; परंतु त्या प्रमाणात अन्नद्रव्ये टाकली जात नाहीत, त्यामुळे जमिनिची सुपिकता टिकून राहिली नसल्याचेही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या निष्कर्षात समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते जमिनीची सुपिकता कमी होण्याची कारणे

  • अतिवृष्टीमुळे होणारी जमिनीची धूप
  • सेंद्रिय पदार्थांचा नगण्य वापर
  • रासायनिक खतांचा असंतुलित वापर
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तसेच हिरवळीच्या खतांचा अल्प वापर

हे करता येईल

  • जमिनीची सुपिकता वाढविण्यासठी सेंद्रिय अन्नघटक वाढविणे गरजेचे आहे.
  • हिरवळीची खते, पालापाचोळ्याचे खत, पिकांचे अवशेष, गांडूळ खत, जैविक खते, साखर कारखान्यांतील ऊस मळीचा वापर करण्याची गरज.

 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...