agriculture news in marathi, 45 acer sugarcane burn due to short circuit in pune district | Agrowon

शॉर्टसर्किटने ४५ एकरांतील ऊस जळाला
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

भवानीनगर, जि. पुणे  ः विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी (ता. ३) सकाळी अकराच्या लागलेल्या आगीत काझड व सणसर भागातील अनेक शेतकऱ्यांचे जवळपास ४० ते ४५ एकर उसाचे पीक जळाले. जवळपास एक किलोमीटर अंतरात लागलेल्या या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्तेच न मिळाल्याने तब्बल चार तास भडकलेली आग उसाचे नुकसान करून थांबली.

भवानीनगर, जि. पुणे  ः विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी (ता. ३) सकाळी अकराच्या लागलेल्या आगीत काझड व सणसर भागातील अनेक शेतकऱ्यांचे जवळपास ४० ते ४५ एकर उसाचे पीक जळाले. जवळपास एक किलोमीटर अंतरात लागलेल्या या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्तेच न मिळाल्याने तब्बल चार तास भडकलेली आग उसाचे नुकसान करून थांबली.

या आगीने व्होरा वस्तीवरील उसाच्या पिकांना वेढा घातला आणि पाहता पाहता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की, अर्ध्या ते एक किलोमीटर अंतरावरून ही आग दिसत होती. प्रकाश निंबाळकर, प्रताप निंबाळकर, संतोष देवडे, चकोर व्होरा, शांतिलाल व्होरा या शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांनाही आगीने वेढले व काही वेळातच एक-एक एकर भस्मसात करीत आग पुढे सरकत गेली. काझडच्या हद्दीतून पुढे सरकलेली आग नीरा डाव्या कालव्याच्या कडेपर्यंत येऊन ठेपली. केवळ नीरा डावा कालवा मध्ये आडवा असल्यानेच आग पुढे सरकली नाही असे येथील शेतकरी सांगत होते.

दरम्यान, ही आग लागताच काही शेतकऱ्यांनी छत्रपती कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर कारखान्याने अग्निशमन दलाची वाहने तेथे पाठविली, मात्र वाहनांना जाण्याइतपत रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या मध्येच अडकल्या. अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच एकमेकांची मदत घेत आगीपासून काही अंतरावरील पिकांमधील पालापाचोळा दूर सारत, उसाची पिके एका बाजूला सारत आगीची धग कमी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तोपर्यंत बऱ्यापैकी उसाची पिके आगीने कवेत घेतली होती.
 

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...