agriculture news in marathi, 46 percent water level in Nashik Dams | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी शिल्लक
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली आहे. आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर झाल्याने सध्या ४६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली आहे.

नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली आहे. आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर झाल्याने सध्या ४६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली आहे.

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पाऊस लांबणीवरही परिणाम होत असल्याचे हवामान खात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. 

डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येऊन त्यानुसार आवर्तने सोडली जात आहे. आजअखेर ४८००४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ६५ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ६९ टक्के पाणी आहे. कश्यपी धरणात ९३, तर आळंदीत ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातून परजिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा घटला आहे. त्यात पालखेड धरणात फक्त नऊ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६४ टक्के पाणी आहे. गिरणा खोर्ऱ्यातील  चणकापूरमध्ये ६० टक्के, तर हरणबारीत ३४ टक्के व गिरणात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षांनंतर पूर्णपणे भरले होते. या धरणातील ८० टक्के पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यांत करण्यात आला आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणांतून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ४६ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...