मराठवाड्यात गारपिटीचा ४६ हजार हेक्टरला फटका

मराठवाड्यात गारपिटीचा ४६ हजार हेक्टरला फटका
मराठवाड्यात गारपिटीचा ४६ हजार हेक्टरला फटका

औरंगाबाद : अखंड संकटांच्या मालिकांचा आघात सहन करणाऱ्या मराठवाड्यात रविवारी (ता. ११) आलेल्या अवकाळी संकटांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक दणका देण्याचे काम केले आहे. सोमवारी (ता. १२) प्रशासकीय प्राथमिक आकडेवारीत जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली,  या सहा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्यामध्ये ३३ टक्‍क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचा आकडा ४३ हजार हेक्‍टरच्या पुढे गेला आहे.  प्रशासकीय यंत्रणेच्या सोमवारी दुपारपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील १८ तालुक्‍यांतील ४६४ गावांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ व विजांच्या कडकडाटाने थैमान घातले होते. कुठे काही मिनिटे, कुठे काही क्षण हजेरी लावणाऱ्या या अवकाळी संकटात जालना जिल्ह्यातील वंजार उम्रद व निवडुंगा येथील दोघांना आपला जीव गमवावा लागला.  हिंगोली जिल्ह्यात एक जण जखमी झाला असून, चारही जिल्ह्यांतील तीन लहान व पंधरा मोठ्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला. जालना, बीड, हिंगोली, लातूर उस्मानाबाद व परभणी या सहा जिल्ह्यांतील १९ हजार ९७१ हेक्‍टरवरील जिरायती, २० हजार ७०५  हेक्‍टवरील बागायती, तर ३ हजार ०४८ हेक्‍टरवरील फळपिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, जालना, अंबड, परतूर, मंठा या पाच तालुक्‍यांतील सर्वाधिक २१७ गावांतील रब्बी,  बागायती व फळपिकांना या अवकाळीचा फटका बसला. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील शिरूर, गेवराई व माजलगाव या तीन तालुक्‍यांतील ४२, तर परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांतील ८०, हिंगोली जिल्ह्यातील एका तालुक्‍यातील दोन, लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ९७, उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यातील २६ गावांना या अवकाळीचा फटका बसला आहे. १२०० कोंबडीच्या पिलांचा मृत्यू लातूर जिल्ह्यात १२०० कोंबडीच्या पिलांचा मृत्यू झाल्याची माहिती लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडून विभागीय आयुक्‍तालयाला कळविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अवकाळीने नुकसान झालेली गावे व क्षेत्र (हेक्टर)

जिल्हा बाधित गावे  एकूण बाधित क्षेत्र ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त 
जालना २१७ २७९६१ २७९६१
परभणी ८० २८४१ २१२०
हिंगोली ९७ ९७
बीड ४२ १०६३२ १०६३२
लातूर ९७ ४३३० २७६९
उस्मानाबाद २६ ६१३ २४५
 एकूण ४६४ ४६४७४ ४३८२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com