agriculture news in Marathi, 47 crore extra fund for agri mechanization, Maharashtra | Agrowon

कृषी यांत्रिकीकरणासाठी ४७ कोटी वाढीव निधी
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नगर ः उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेत कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेतकऱ्यांना विविध शेती औजारांचा लाभ दिला जातो. यासाठी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील चौदा जिल्ह्यांसाठी ४७ कोटी २४ लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. प्राप्त निधीतून ठरलेल्या सूत्रानुसार साठ टक्के ट्रॅक्टर व चाळीस टक्के निधी अन्य औजारांवर खर्च केला जाणार आहे.

नगर ः उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेत कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेतकऱ्यांना विविध शेती औजारांचा लाभ दिला जातो. यासाठी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील चौदा जिल्ह्यांसाठी ४७ कोटी २४ लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. प्राप्त निधीतून ठरलेल्या सूत्रानुसार साठ टक्के ट्रॅक्टर व चाळीस टक्के निधी अन्य औजारांवर खर्च केला जाणार आहे.

शेती समृद्ध करण्यासाठी, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने यंदापासून उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले. या अभियानात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना पेरणीयंत्र, मळणीयंत्र, रोटावेटर, कल्टी, दाळमील यांसह अन्य औजारे आणि ट्रॅक्‍टरचा लाभ दिला जात आहे.

वीस एचपीच्या पुढील ट्रॅक्‍टरला अनुसूचित जाती, जमाती, महिला व अल्प भूधारकांना सव्वा लाख, तर अन्य लाभार्थींना एक लाख, तर वीस एचपीच्या आतील ट्रॅक्‍टरला अनुसूचित जाती, जमाती, महिला व अल्पभूधारकांना एक लाख, अन्य लाभार्थ्यांना ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी आता पुन्हा नव्याने दुसऱ्या टप्प्यात चौदा जिल्ह्यांसाठी ४७ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

नगर जिल्ह्यासाठी यापूर्वी आठ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर होता. आता पुन्हा दहा कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्ह्यामध्ये औजारे व टॅक्‍टरसाठी १४ हजार ३६८ अर्ज आतापर्यंत शेतकऱ्यांनी केले होते. त्यासाठी ११६ कोटी २३ लाखांचा निधी हवा आहे. ५५२३ शेतकऱ्यांची कृषी विभागाने सोडत पद्धतीने निवड केली. २३४९ शेतकऱ्यांना निवडपत्र दिले, तर १५७४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. १३७९ शेतकऱ्यांना ९ कोटी २८ लाख २१ हजार रुपयाचे अनुदान वाटप केले. आता वाढीव निधी आल्यामुळे निवडपत्र दिलेल्या सगळ्यांना लाभ मिळणार आहे. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेत कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेती औजारे व टॅक्‍टरचा लाभ मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत.

जिल्हानिहाय वाढीव निधी
नाशिक ः चार कोटी, धुळे ः एक कोटी ३४ लाख, नंदुरबार ः एक कोटी, जळगाव ः दोन कोटी चाळीस लाख, नगर ः दहा कोटी, पुणे ः नऊ कोटी, सोलापूर ः सहा कोटी, सातारा ः तीन कोटी, सांगली ः पाच कोटी, कोल्हापूर ः दोन कोटी, लातूर व उस्मानाबाद ः प्रत्येकी एक कोटी, परभणी व हिंगोली ः प्रत्येकी ७५ लाख.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...