agriculture news in marathi, 5 crore fund for Zilla Parishad Agriculture Department | Agrowon

सातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५ कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

सातारा  : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५) झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१८-१९ वर्षासाठीच्या ४५ कोटी ८८ लाखांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये कृषी, शिक्षण व बांधकाम विभागाला गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव निधी देण्यात आला. हा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत प्रशासकीय मान्यता घेण्याबरोबरच निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर द्याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांना दिल्या.

सातारा  : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५) झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१८-१९ वर्षासाठीच्या ४५ कोटी ८८ लाखांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये कृषी, शिक्षण व बांधकाम विभागाला गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव निधी देण्यात आला. हा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत प्रशासकीय मान्यता घेण्याबरोबरच निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर द्याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांना दिल्या.

 नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार यांनी मूळ अंदाजपत्रकासह पुरवणी अंदाजपत्रक मांडले. यावर्षी मूळ अंदाजपत्रकात ४५ कोटी ८८ लाख ३४ हजारांची तरतूद केली आहे. त्यामुळे त्यासह ७५ कोटी ८६ लाख ४४ हजारांवर अंदाजपत्रक पोचले.

गेल्या वर्षी पुरवणी अंदाजपत्रक ३४ कोटी ४९ लाखांचे होते. या वर्षी  ते ४५ कोटी ८८ लाखांचे करण्यात आले. त्यामुळे बहुतांश विभागांना निधी वाढवून मिळाला. सप्टेंबर अथवा ऑक्‍टोबरमध्ये मांडले जाणारे पुरवणी अंदाजपत्रक यावर्षी जूनमध्ये मांडल्याने सभागृहाने पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गेल्या वर्षी अंतिम सुधारित अंदाजपत्रकातील तरतूद

कृषी       -   २ कोटी ९५ लाख
शिक्षण    -   ५ कोटी ४१ लाख
बांधकाम  -  १६ कोटी ४२ लाख

यंदाची तरतूद

कृषी       -   ५ कोटी
शिक्षण    -   ५ कोटी ५० लाख
बांधकाम  -  २० कोटी

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...