agriculture news in marathi, 5 crore spent on agricultural mechanization in Marathwada, aurangabad | Agrowon

मराठवाड्यात कृषी यांत्रिकीकरणावर केवळ पावणेपाच कोटी खर्च
संतोष मुंढे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद  : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान आणले. त्याअंतर्गत शेतीकाम सुलभ होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियान आले. या अभियानासाठी मराठवाड्यात सप्टेंबर अखेरपर्यंत साडेबारा कोटीवर निधीही प्राप्त झाला. परंतु प्रत्यक्षात केवळ चार कोटी ८१ लाख १७ हजार रुपयेच खर्च झाल्याचे आकडे सांगतात.

औरंगाबाद  : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान आणले. त्याअंतर्गत शेतीकाम सुलभ होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियान आले. या अभियानासाठी मराठवाड्यात सप्टेंबर अखेरपर्यंत साडेबारा कोटीवर निधीही प्राप्त झाला. परंतु प्रत्यक्षात केवळ चार कोटी ८१ लाख १७ हजार रुपयेच खर्च झाल्याचे आकडे सांगतात.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून पेरणी, हार्वेस्टिंग सोबतच मूलस्थानी जलसंधारण आदी विविध उद्देश साध्य करण्याचे धोरण शासनाने स्पष्ट केले. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या मजुराच्या प्रश्नावरही पर्याय मिळणे अपेक्षित आहे.

यांत्रिकीकरण योजनेच्या फलश्रुतीसाठी शासनाकडून योजनेअंतर्गत सहभागासाठी संयत्र खरेदीची तयारी दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांसाठी २ कोटी ९८ लाख ८८ हजार रुपये, तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या पाच जिल्ह्यांसाठी ९ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

सप्टेंबरअखेर औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कृषी यांत्रिकीकरणावर प्राप्त निधीपैकी २ कोटी १ लाख १७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांत मात्र केवळ २ कोटी ८० लाख रुपयांचाच निधी खर्च झाला. परंतु मराठवाड्यात योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांमध्ये खासकरून लातूर कृषी विभागात अनुत्साह दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
कायद्याचे बोला...शेतीमालाच्या भावात वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
हमीभावाने शेतीमाल विकताना कशाचीच निश्‍...पुणे :  शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे व्यापारी...पुणे ः शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात असताना हमीभावाने...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...