नांदेड जिल्ह्यात फळबाग योजनेसाठी ५ हजार प्रस्ताव

फळबाग योजनेअंतर्गत ५ हजार ३१६ प्रस्ताव
फळबाग योजनेअंतर्गत ५ हजार ३१६ प्रस्ताव

नांदेड ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी ५ हजार ७४.३८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे सादर केले आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, पेरू, संत्रा, मोसंबी, चिकू, लिंबू, सीताफळ या फळपिकांची लागवड करता येणार आहे.

विहीत मुदतीत सोळा तालुक्यांतील ५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये नांदेड तालुक्यातून २९२ प्रस्ताव, अर्धापूर तालुक्यातून ११३, कंधार तालुक्यातून ३८७, मुदखेड तालुक्यातून ७५, लोहा तालुक्यातून १ हजार १९९, देगलूर तालुक्यातून २५४, नायगाव तालुक्यातून ९८, मुखेड तालुक्यातून ५२३, बिलोली तालुक्यातून ८२, धर्माबाद तालुक्यातून ४१, किनवट तालुक्यातून ३२१, माहूर तालुक्यातून ३२४, भोकर तालुक्यातून ४८७, हदगाव तालुक्यातून ७२०, हिमायतनगर तालुक्यातून २१०, उमरी तालुक्यातून १९७ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com