हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख मदत मंजूर
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख मदत मंजूर

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख मदत मंजूर

बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील पुलवामा भागात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बाॅँबस्फोटात जिल्ह्यातील दोन जवानांना वीर मरण आले. या जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने प्रत्येकी ५० लाखांची मदत घोषित केली होती. या रकमेस मंजुरी देण्यात आली असून, वीर जवानांच्या पत्नी, आई-वडिलांना ही मदत दिली जाणार आहे.  गुरुवारी (ता. १४) झालेल्या घटनेत बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह राजपूत आणि गोवर्धननगर तांडा येथील नितीन राठोड हे दोन सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले होते. त्यांच्यावर शनिवारी (ता.१६) मूळ गावी अंत्यसंस्कार झाले. शासनाने या वीर जवानांच्या कुटुंबांसाठी ५० लाखांची मदत घोषित केली होती. ही मदत तातडीने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जाहीर मदतीनुसार मलकापूर येथील संजय भिकमसिंह राजपूत या जवानाची पत्नी सुषमा यांना ३० लाख व आई श्रीमती जिजाबाई राजपूत यांना २० लाखांची रक्कम दिली जाईल. तर गोवर्धननगर तांडा येथील नितीन शिवाजी राठोड यांची पत्नी वंदना यांना ३० लाख, विरमाता सावित्रीबाई राठोड यांना १० लाख, वीरपिता शिवाजी रामू राठोड यांना १० लाख रुपये दिले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com