मराठवाड्यात यंदा निम्माच पीकविमा

यंदा निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा उतरविणे झाले शक्‍य
यंदा निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा उतरविणे झाले शक्‍य

औरंगाबाद : गतवर्षी खरिपात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५३ लाख ७० हजारांवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. मात्र, यंदा त्या तुलनेत २५ जुलैअखेरपर्यंत २७ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरीप २०१७ मध्ये ५३ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. राज्यातील पहिल्या आठ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामध्ये बीड सर्वात शीर्षस्थानी तर नांदेड, जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली आदी जिल्ह्यांचा अनुक्रमे क्रमांक लागला होता. शेतकऱ्यांनी विक्रमी संख्येने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविल्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांचा गौरवही झाला होता. गतवर्षी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पिकाचा विमा उतरविता आला.

यंदा मात्र मुदत वाढली असली तरी ऑनलाइनच विमा स्वीकारण्याचा निर्णय आहे. त्यातच सर्व्हर डाउन, पोर्टल बंदने विमा उतरविण्याचा कामात आजपर्यंत प्रचंड अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सहभाग प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वाढण्याला गती मिळताना दिसत नाही. प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतून २५ जुलैपर्यंत १२ लाख ९६ हजारांवर शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. शिवाय लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांतून १४ लाख शेतकऱ्यांचेच विमा अर्ज आले होते.

गतवर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत ही संख्या निम्मीच आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातून १ लाख ८० हजार, जालनामधून ३ लाख ९६ हजार, बीड जिल्ह्यातून ७ लाख १९ हजार, लातूरमधून केवळ ४७ हजार, उस्मानाबादमधून २ लाख ८३ हजार, नांदेडमधून ७ लाख ३ हजार, परभणीमधून २ लाख ४८ हजार तर हिंगोलीतून केवळ १ लाख २१ हजार पीकविमा अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मुदत वाढवली असली तरी आवश्‍यक सुविधा मिळाल्याशिवाय कायम पावसाच्या दुष्टचक्राचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना किमान विम्याचे कवच मिळूच शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खरीप २०१७ मध्ये विमा योजनेत सहभागी शेतकरी संख्या
जिल्हा संख्या
बीड ११८०१३४
नांदेड ९६०९१९
जालना ८०१८२९
लातूर ७५२७५०
परभणी ५९२०२६
उस्मानाबाद ३७१०८७
औरंगाबाद ४८८०५४
४८८०५४ २२३३१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com