agriculture news in Marathi, 50 percent tea production from small growers, Maharashtra | Agrowon

छोट्या चहा उत्पादकांकडून ५० टक्के उत्पादन
वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

देशात सध्या चहा उत्पादन वाढले असले तरी त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे चहाचे दर कमी झाले आहेत. छोट्या उत्पादकांचे उत्पादन वाढत असल्याने मोठ्या उद्योगांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
- पी. के. बेझबारुआह, सचिव, चहा बोर्ड

कोलकता ः चहाच्या मोठ्या मळ्यांपेक्षा छोट्या चहा उत्पादकांचा देशातील एकूण उत्पादनातील वाटा वाढत आहे. २०१७ मध्ये एकूण उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के उत्पादन हे छोट्या उत्पादाकांनी घेतले आहे, अशी माहिती भारतीय चहा असोसिएशनने दिली आहे.

चहा बोर्डानुसार चहा उत्पादनाची ही स्थिती पाहिजे तेवढी समाधानकारक नाही. यामुळे बाजारात चहाच्या किमतीत मोठे चढ-उतार येऊ शकतात. २०१७ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या काळात १३४८.८४ दशलक्ष किलो चहाचे उत्पादन झाले आहे. यापैकी छोट्या उत्पादकांनी ६३१.६९ दशलक्ष किलो उत्पादन घेतले आहे.

चहा बोर्डाचे सचिव पी. के. बेझबारुआह म्हणाले, की चहाला मागणी वाढली तर ठीक आहे, नाहीतर उत्पादनाची हीच प्रवृत्ती राहिली तर संपूर्ण चहा उद्योग विस्कळित होईल आणि आर्थिक संकट अधिक गडद होत जाईल. पाने खरेदी कारखाने आणि छोट्या उत्पादकांचा उत्पादन खर्च हा स्थापित संमिश्र चहा मळ्यांच्या तुलनेत कमी आहे. तसेच पाने खरेदी कारखाने छोट्या उत्पादकांकडून पाने खरेदी करून त्यावर प्रक्रिया करतात. पाने खरेदीसाठी त्यांना उत्पादकांना पैसे द्यावे लागतात. दक्षिण भारत त्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये छोट्या चहा उत्पादकांचा हिस्सा एकूण उत्पादनात जास्त आहे.

‘‘सध्या चहा उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्यात चांगल्या प्रतीच्या पानांची मागणी पूर्ण होत नाही. चहाच्या दर्जेदार आणि चांगल्या प्रतीच्या हिरव्या पानांची तोडणी आवश्यक आहे. मात्र छोटे चहा उत्पादक आणि स्थिपित संमिश्र चहा मळेवाले असे पाने तोडण्यात कमी रस घेताना दिसतात. छोट्या उत्पादकांकडूनच जास्त उत्पादन होत असल्याने त्याचा परिणाम चहाच्या गुणवत्तेवर होत आहे. छोटे उत्पादक जास्त उत्पादनासाठी मोठ्या आकाराची पाने आणि कळ्याही तोडतात. मात्र त्यामुळे चहाची गुणवत्ता खालावते’’, असही ते म्हणाले.

गुणवत्तेचा प्रश्‍न
चहाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लहान हिरव्या चांगल्या दर्जाच्या पानांची तोडणी होणे आवश्यक असते. चहा उद्योगाकडून या पानांना मागणी असते. मात्र छोटे उत्पादक हे उत्पादन वाढीसाठी मोठी पाने व कळ्याही तोडतात. त्याचा परिणाम चहाच्या गुणवत्तेवर होते. त्यामुळे चहा बोर्ड शेतकऱ्यांना दर्जेदार पानांची काढणी आणि व्यवस्थापनाविषयी माहिती देत आहे.  

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...