agriculture news in marathi, 500 agricultural tourism centers will be set up in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभारणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

सोलापूर : ‘‘सोलापुरात शेतीक्षेत्रात मोठी संधी असून, कृषी पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. सोलापूरचा नावलौकिक व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात येत्या काळात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभी केली जातील,’’ असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.

सोलापूर : ‘‘सोलापुरात शेतीक्षेत्रात मोठी संधी असून, कृषी पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. सोलापूरचा नावलौकिक व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात येत्या काळात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभी केली जातील,’’ असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.

सोलापूर विद्यापीठाच्या कृषी पर्यटन केंद्राचे उद्‍घाटनमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, प्रा. डॉ. गौतम कांबळे, केंद्राच्या समन्वयक डॉ. माया पाटील, प्रा. तेजस्विनी कांबळे, डॉ. विनायक धुळप आदी उपस्थित होते. रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला.

 देशमुख म्हणाले, ‘‘शेती-मातीचे विषय आपल्याला कळले पाहिजेत. विशेषतः ग्रामीण संस्कृती अनुभवता आली पाहिजे. त्याच हेतूने विद्यापीठाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यापुढेही कृषी पर्यटनाला अधिकाधिक वाव मिळण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र साकारण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून सोलापूरच्या पर्यटनवाढीला चालना मिळेल. जेणेकरून मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर मेक इन सोलापूर होईल. त्यासाठी सर्वांचे योगदान हवे.’’

डॉ. फडणवीस म्हणाल्या, ‘‘कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक वेगळा उद्योग सुरू करून विकास साधण्याची संधी शेतकऱ्यांना मिळेल. या कृषी पर्यटनाचा विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठातील इनक्‍युबेशन सेंटरच्या माध्यमातूनही कृषी पर्यटन केंद्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...