agriculture news in marathi, 500 rupees election from expenses for grampanchayat | Agrowon

ग्रामपंचायत अर्ज भरण्याचा खर्च ५०० रुपयांवर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकही ऑनलाइन अर्ज दाखल झालेला नाही. सर्व्हर डाउन व इतर समस्यांना अर्ज दाखल करणाऱ्या ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतींच्या भावी उमेदवारांना समोरे जावे लागत आहे.

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकही ऑनलाइन अर्ज दाखल झालेला नाही. सर्व्हर डाउन व इतर समस्यांना अर्ज दाखल करणाऱ्या ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतींच्या भावी उमेदवारांना समोरे जावे लागत आहे.

 हा अर्ज निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या संकेतस्थळावर दाखल करावा लागत आहे. त्यासाठी मालमत्तेची सविस्तर माहितीसह आधार कार्ड आदी प्राथमिक व काही तांत्रिक माहितीदेखील आवश्‍यक आहे. ती गोळा करताना काही उमेदवारांची दमछाक होत आहे. १० फेब्रुवारी ही ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्याशिवाय निर्देशित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ऑफलाइन अर्ज दाखल करता येत नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल करावा लागतो, पण ऑनलाइन अर्जच दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्जच आलेले नसल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात सध्या ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. चोपडा, जामनेर व अमळनेर तालुक्‍यातील अधिक ग्रामपंचायती असून, रावेर, जळगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एक व तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ४०० ते ५०० रुपये एवढा खर्च उमेदवाराला येत आहे. ऑनलाईइन अर्ज दाखल करणाऱ्या सायबर व ई- सेवा केंद्रचालकांकडे उमेदवारांची गर्दी होत आहे. १२ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी आहे, तर १५ रोजी माघार होईल. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २६ ला मतमोजणी होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...