मागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.
ताज्या घडामोडी
नवी दिल्ली ः नोटाबंदीनंतर नवीन पाचशे रुपयांच्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपये खर्च केले अाहेत, अशी लेखी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत दिली अाहे. नोटाबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत पाचशेच्या नवीन १,६९५.७ कोटी नोटा छापण्यात अाल्या अाहेत. यासाठी ४,९६८.८४ कोटी खर्च अाला अाहे, असे लेखी उत्तरातून स्पष्ट केले अाहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर करून चलनातील एक हजार अाणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या नोटांचे चलनातील प्रमाण ८६ टक्के होते. सुमारे ९९ टक्के रद्द नोटा अारबीअायला परत करण्यात अाल्या अाहेत. मात्र, नोटाबंदीनंतर नवीन नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला मोठा खर्च करावा लागला असल्याचे लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले अाहे.
रिझर्व्ह बॅंकेने (अारबीअाय) नवीन दोन हजार रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटांची छपाई केली अाहे. या दोन हजारांच्या नोटांसाठी १,२९३.६ कोटी रुपये खर्च अाला अाहे. तसेच दोनशे रुपयांच्या १७८ कोटी नोटा छापण्यासाठी ५२२.८३ कोटी खर्च करण्यात अाला अाहे, अशीही माहिती वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दिली अाहे.
नोटाबंदीनंतर १५.२८ कोटी चलन जमा
अारबीअायने २०१५-१६ या वर्षात अतिरिक्त ६५,८७६ कोटी रुपये केंद्र सरकारने हस्तांतरित केले अाहेत. २०१६-१७ मध्ये ३०,६५९ कोटी रक्कम हस्तांतरित करण्यात अाली अाहे. नोटाबंदीनंतर रद्द करण्यात अालेले १५.२८ लाख कोटी रुपये चलन ३० जून २०१७ पर्यंत जमा झाले अाहे, असे वित्त राज्यमंत्र्यांनी दुसऱ्या एका लेखी उत्तरातून माहिती दिली अाहे.
- 1 of 145
- ››