agriculture news in Marathi, 51 thousand animals in fodder camp in Satara, Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील छावण्यांत ५१ हजार जनावरे दाखल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

सातारा ः जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाणी व चाराटंचाई तीव्र होऊ लागली आहे. या टंचाईमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा तर माण, खटाव व फलटण या तीन तालुक्यांत ८० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. या चारा छावण्यांत लहान-मोठी मिळून ५१ हजार ४६३ जनावरे दाखल झाली आहेत. दिवसेंदिवस छावण्यात जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे.

सातारा ः जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाणी व चाराटंचाई तीव्र होऊ लागली आहे. या टंचाईमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा तर माण, खटाव व फलटण या तीन तालुक्यांत ८० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. या चारा छावण्यांत लहान-मोठी मिळून ५१ हजार ४६३ जनावरे दाखल झाली आहेत. दिवसेंदिवस छावण्यात जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे.

 जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत चारा व पाणी स्थिती बिकट होऊ लागल्याने प्रशासनाकडून जनावरांसाठी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी प्रसाशनाकडून संस्थांना प्रस्ताव मागविण्यात आले होते. सुरवातीच्या काळात या संस्थांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याने जनावरांनाचे आरोग्य धोक्यात आले होते.

त्यानंतर छावण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले होते. चाराटंचाईमुळे प्रशासनाकडून मागणी होईल तेथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यात सध्या ८० चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ५१ हजार ४६३ जनावरे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ७० चारा छावण्यांत ६,५८७ लहान, ४१,२६८ मोठी अशी एकूण ४७ हजार ८५५ जनावरे दाखल झाली आहेत.

खटाव तालुक्यात आठ चारा छावण्यांत २४३ लहान, १३१९ मोठी, अशी एकूण १५६२ जनावरे दाखल झाली आहेत. फलटण तालुक्यात टंचाई तीव्र झाल्याने या तालुक्यात दोन चारा छावण्यात २९९ लहान व १४७४ मोठी, अशी एकूण २०४६ जनावरे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने टॅंकरच्या मागणीत वाढ होत आहे.

जनावरे छावणीत घेऊन जाण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नसल्याने प्रतिदिन जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. चाराटंचाई भीषण असल्याने चाऱ्यासाठी सर्वाधिक उसाचा उपयोग केला जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः...पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा...
खत आयातीत हेराफेरीपुणे : शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या नावाखाली...
शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला; पण पीकविमा...सोलापूर ः पीकविम्याच्या विषयावर सातत्याने...
मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा...औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
आयात खाद्यतेलावर १० टक्के विकासकर लावाः...लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर...
कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावलासिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...