agriculture news in marathi, 52 lakh quintal Harbara repurchase Still pending in Jalgaon District | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी अपूर्ण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीचा वेग सुरवातीपासून बरा असला तरी अद्याप नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सुमारे ५२ हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेला नाही. त्यामुळे पुढे हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. 

जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीचा वेग सुरवातीपासून बरा असला तरी अद्याप नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सुमारे ५२ हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेला नाही. त्यामुळे पुढे हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. 

जिल्हाभरात आत्तापर्यंत ६६ हजार क्विंटल हरभरा खरेदी १२ शासकीय खरेदी केंद्रांमध्ये पूर्ण झाली आहे. ही खरेदी मध्यंतरी बारदान व इतर अडचणींमुळे रखडत सुरू होती. परंतु या महिन्याच्या मध्यापासून खरेदी वेगात सुरू झाली. जिल्ह्यात पारोळा, अमळनेर येथील हरभरा खरेदी केंद्र मध्यंतरी काही कारणांनी बंद होते. तसेच रावेर व जामनेरच्या केंद्रातही अडचणी आल्या होत्या. तर जळगाव येथील केंद्रातही शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.

खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. या सगळ्या स्थितीत आता मंगळवारी (ता. २९) खरेदी बंद होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी केली आहे, त्यांचा सुमारे ५२ हजार क्विंटल हरभरा पडून राहील, असे निश्‍चित आहे. त्यामुळे हरभरा खरेदीला शासनाने तातडीने मुदतवाढ द्यायला हवी. कारण पुढे खरीप हंगाम उभा करायचा असून, बॅंकांनी कर्ज वितरण सुरू केलेले नसल्याने अडचणी वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरभरा खरेदीसाठी पारोळा, अमळनेर, जळगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव येथे खरेदी केंद्र सुरू केले होते. 

गोदामांची अडचण
सध्या हरभरा साठवणुकीसाठी मार्केटिंग फेडरेशनला गोदामांची अडचणही येत आहे. पाच गोदामे जिल्ह्यात वखार महामंडळाने उपलब्ध करून दिली होती. ती पूर्ण भरली आहेत. अलीकडेच जळगाव शहरात आणखी एक गोदाम उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रशासन राबवित आहे, अशी माहिती मिळाली. 

जिल्ह्यात हरभरा खरेदी अपेक्षित गतीने केली. मध्यंतरी गोदामांची अडचण आली. जळगावात एक गोदाम उपलब्ध होणार आहे. शासनाने मुदतवाढ दिली तर हरभरा खरेदी पुन्हा सुरू होईल. मंगळवारी (ता. २९) खरेदी सायंकाळी बंद होईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटगिं फेडरेशन

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...