agriculture news in marathi, 52 samples of refugee cotton seed non certified | Agrowon

रिफ्यूजी बियाण्यांतील २५० पैकी ५२ नमुने निघाले अप्रमाणित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर : गेल्या खरिपात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागे झालेल्या कृषी विभागाकडून बीटी बियाण्यांसोबत दिल्या जाणाऱ्या रिफ्यूजी (नॉन बीटी) बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. एकट्या अमरावती विभागात घेण्यात आलेल्या २५० नमुन्यांपैकी तब्बल ५२ नमुने अप्रमाणित निघाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

नागपूर : गेल्या खरिपात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागे झालेल्या कृषी विभागाकडून बीटी बियाण्यांसोबत दिल्या जाणाऱ्या रिफ्यूजी (नॉन बीटी) बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. एकट्या अमरावती विभागात घेण्यात आलेल्या २५० नमुन्यांपैकी तब्बल ५२ नमुने अप्रमाणित निघाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात ३९ ते ४० लाख हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. गेल्या वर्षी यातील मोठ्या क्षेत्रावरील कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. उत्पादकता यामुळे प्रभावित झाल्याने सरकारने त्यासाठी नुकसानभरपाईची घोषणादेखील केली. मदत अद्याप मिळाली नसली तरी सरकारने बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यामागील नेमक्‍या कारणांचा वेध घेण्यासाठी अनेक तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याकरिता बीटी जीनचा अंतर्भाव असलेल्या ४१० कपाशी झाडांच्या पानांच्या नमुन्यांचे सॅम्पल घेण्यात आले. या पानातील गुणधर्मांचे पृथक्करण प्रयोगशाळेत करून त्याआधारेदेखील कंपन्यांना घेरण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत होत आहे. पानांमध्ये बीटी जीनचे गुणधर्म अधिक असतात. त्यामुळे प्रयोगशाळेतील पृथक्करणाअंती समोर आलेले निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार असल्याचे सूत्र सांगतात. विशेष म्हणजे बोंड अळीप्रकरणी शासनाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाईतील १६ हजार रुपये बियाणे कंपन्यांकडून वसूल केले जाणार आहेत. त्याकरिता तांत्रिक पुरावे जमा करण्यावर सरकारी पातळीवर भर दिला जात आहे.

नॉन बीटीचे ५२ नमुने अप्रमाणित
बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यामागे शेतकऱ्यांद्वारे रिफ्यूजी (नॉन बीटी) लावले नसल्याचे कारण देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर अमरावती विभागात कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेने २५० नॉनबिटी कापसाचे नमुने घेतले. यातील तब्बल ५२ नमुने अप्रमाणित निघाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. हा खुलासा झाल्यानंतर कृषी विभागाने ५२ पैकी ४८ प्रकरणांत न्यायालयात धाव घेत संबंधित कंपन्यांना घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

कृषी सचिवांची सीआयसीआरला भेट
राज्यात ४० लाख हेक्‍टरवर लागवड होणाऱ्या कापसाकरिता पर्याय सध्यातरी कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे या वर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही; याकरिता उपाययोजना व जागृती करणे इतकेच कृषी विभागाच्या हाती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अवर मुख्य सचिव (कृषी) यांनी आठवडाभरापूर्वीच केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक विजय वाघमारे यांची भेट घेतली. येत्या हंगामात बोंड अळी येणार नाही; त्याकरिता हंगामाच्या सुरवातीपासूनच काय दक्षता घ्यावी, तसेच हर्बीसाइड टॉलरंट बियाणे विकले जाणार नाहीत, यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्र सांगतात. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...