agriculture news in marathi, 54 lakh ton crushing done in Aurangabad region | Agrowon

औरंगाबाद विभागात ५४ लाख टनांचे गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड, तसेच खानदेशातील जळगाव व धुळे या पाच जिल्ह्यांतील २१ साखर कारखाने यंदा उस गाळप करत आहेत. या कारखान्यांनी आजवर ५४ लाख १५ हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यापासून ५० लाख ४७ हजार ९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाने दिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड, तसेच खानदेशातील जळगाव व धुळे या पाच जिल्ह्यांतील २१ साखर कारखाने यंदा उस गाळप करत आहेत. या कारखान्यांनी आजवर ५४ लाख १५ हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यापासून ५० लाख ४७ हजार ९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाने दिली. 

औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील सहा जिल्ह्यांत यंदा ६० ते ६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज होता. गत काही वर्षांत या सहाही जिल्ह्यांतील कारखान्यांचा हंगाम यंदा अपेक्षेच्या कसोटीवर खरा उतरण्याची चिन्हे होती. या अपेक्षेनुसार मराठवाडा व खानदेशातील सहा जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत ५४ लाख १५ हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.
 या उसाच्या गाळपातून आजवर ५० लाख ४७ हजार ९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वच साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.३२ टक्‍के आला आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी ८.७५ टक्‍के, तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वांत जास्त सरासरी ९.४८ टक्‍के साखर उतारा राहिल्याची माहिती साखर विभागाने दिली. 

रक्‍कम वाटपाची स्थिती
गाळपासाठी उचल केलेल्या उसाच्या रकमेपोटी २१ कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ७८.६६ टक्‍के रक्‍कम वाटप केली आहे. ३१ जानेवारीपूर्वीच्या अहवालानुसार गाळप केलेल्या उसापोटी उत्पादकांना ७८९७९.४९ लाख रुपये वाटप करणे अपेक्षित होते. कारखान्यांनी त्यापैकी ६२१२१.५७ लाख रुपयांचे वाटप केले. १९०७१.७१ लाख रुपयांचा एरीअस साखर विभागाच्या अहवालात दिसतो आहे.

कारखाने, तसेच ऊस गाळप (मेट्रिक टनात) व 
साखर उत्पादन (क्‍विंटलमध्ये) साखर उतारा (टक्‍क्‍यात)

जिल्हा कारखाने संख्या ऊस गाळप साखर उत्पादन सरासरी उतारा
औरंगाबाद. ९२७२२५. ८६२२०० ९.३४
जालना ५. १२९८५९१ १२२११७५ ९.४
बीड. ७. २२०२२९० २०४६७५० ९.२९
जळगाव २. ३१६७४० २७७०५० ८.७५
नंदुरबार. ६७०६६९ ६३५९२०. ९.४८

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...