मराठवाड्यात ५४२ गावांत ‘जलयुक्‍त’ची कामे सुरू

मराठवाड्यात ५४२ गावांत ‘जलयुक्‍त’ची कामे सुरू
मराठवाड्यात ५४२ गावांत ‘जलयुक्‍त’ची कामे सुरू

औरंगाबाद : मराठवाड्यात २०१८-१९ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी १५७५ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामधील ५४२ गावांत जलयुक्‍त शिवारची कामे सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात २०१८-१९ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्यासाठी निवडण्यात आलेल्या १५७५ गावांपैकी १४३३ गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा तयार असलेल्या गावांपैकी ५४२ गावांमध्ये जलयुक्‍तची कामे सुरू आहेत. जिल्हास्तरीय आराखड्यानुसार २५ हजार ७४७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी २१२६ कामे पूर्ण झाली आहेत. ३३६ कामे प्रगतिपथावर आहेत. मंजूर करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आराखड्याची एकूण किंमत ७४९ कोटी ६१ लाख रुपये असून ३ कोटी ४६ लाख रुपये खर्च झाले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

२०१७-१८ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत मराठवाड्यातील १२४८ गावांची निवड करण्यात आली होती. या सर्व गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जिल्हास्तरीय आराखड्यानुसार २८ हजार ४४८ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी २२ हजार ६१६ कामे पूर्ण झाली, तर ४२६० कामे प्रगतीपथावर होती. २१०३ कामे अद्यापही सुरू करण्यात आली नव्हती. मंजूर जिल्हास्तरीय आराखड्याची एकूण किंमत ७३६ कोटी १४ लाख रुपये होती. त्यापैकी ११४ कोटी ४७ लाखांचा निधी प्राप्त झाला होता, तर १३१ कोटी १४ लाख रूपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१७-१८ मध्ये जलयुक्‍तची ५३२ गावांमध्ये शंभर टक्‍के कामे झाली. ४२७ गावांत ८० टक्‍के, २६० गावांत ५० टक्‍के, २९ गावांत ३० टक्‍के कामे झाली. लोकसहभागातून ३७६ गावांमध्ये २२६ गाळ काढण्याची कामे झाली. जवळपास ४०.४३ लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याचेही जलयुक्‍त शिवार अभियान यंत्रणेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. शासकीय मशिनद्वारे ५४३ गाळ काढण्याची कामे झाली. त्यामधून ३४.०९ लक्ष घनमीटर गाळ ७६७ कामातून काढण्यात आला. जवळपास २९ कोटी ११ लाख रुपयांच्या लोकसहभागातून ७४.५२ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. विविध कामांमुळे २०१७-१८ मध्ये १.६४ लाख टीसीएम पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com