agriculture news in marathi, 55 thousand hectare area wasted due to water in Gondia | Agrowon

गोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. परंतु, आजही अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील अशीच रखडली. धान उत्पादक तर शासनाच्या लेखी बेदखलच आहेत. त्यावरूनच शासनाची असंवेदनशीलता दिसून येते.
- संजय सत्येकार, शेतकरी नेते, कन्हान.

गोंदिया : कर्जमाफी आणि बोंड अळीच्या मदतीत भुलविणाऱ्या सरकारने धान उत्पादकांनादेखील वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिल्याचे चित्र आहे. 

पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नर्सरी टाकून मशागत केली. परंतु, २०१७ मधील खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. परिणामी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रात रोवणीच झाली नाही. आठ तालुक्‍यांतील ३८ महसूल मंडळाचा यामध्ये समावेश होता. 

सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे पऱ्हे टाकले. तसेच हवामान विभागानेसुद्धा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला. शेतीची मशागतही त्याआधारे आटोपण्यात आली. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाण्याचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. याचा सविस्तर अहवाल कृषी विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु, शासनाकडून मदतीसंदर्भाने वर्षभरानंतरही कोणताच निर्णय न घेण्यात आल्याने धान उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...