agriculture news in Marathi, 56 TMC water to Gujrat, Maharashtra | Agrowon

गुजरातच्या घशात ५६ टीएमसी पाणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नाशिक : महाराष्ट्राच्या दमणगंगा खोऱ्यातील ५५ पैकी ३५ टीएमसी आणी नार-पार खोऱ्यातील ३७ पैकी २१ टीएमसी पाणी असे एकूण ५६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली केंद्र व राज्य स्तरावर सुरू आहेत. पाणीवाटपाचा सामंजस्य करार करणार असाल तरच १५ हजार कोटी महाराष्ट्राला देतो, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याने त्या दबावापोटी हा करार होणार असल्याचा आरोप जलचिंतन संस्थेचे प्रमुख राजेंद्र जाधव यांनी केला आहे.

नाशिक : महाराष्ट्राच्या दमणगंगा खोऱ्यातील ५५ पैकी ३५ टीएमसी आणी नार-पार खोऱ्यातील ३७ पैकी २१ टीएमसी पाणी असे एकूण ५६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली केंद्र व राज्य स्तरावर सुरू आहेत. पाणीवाटपाचा सामंजस्य करार करणार असाल तरच १५ हजार कोटी महाराष्ट्राला देतो, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याने त्या दबावापोटी हा करार होणार असल्याचा आरोप जलचिंतन संस्थेचे प्रमुख राजेंद्र जाधव यांनी केला आहे.

गुजरातला पाणी देण्याच्या विरोधात ''जलचिंतन''ने चार वेळा उपोषण केले, तर छगन भुजबळ यांनी विधानसभेत आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांनी विधिमंडळाला दिले आहे. त्यानंतरही पाणी पळवण्याचे कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावरच गुजरातमध्ये समुद्रात खंबाटचे धरण, कच्छ-सौराष्ट्राचे सिंचन व मुंबईपेक्षा मोठी अशी धोलेरा नावाची मेगासिटी उभारण्यात येत आहे. याच अनुषंगाने १५ दिवसांत महाराष्ट्राने गुजरातबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी, आम्ही नदीजोडचे भूमिपूजन करतो, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक येथे केल्याचे जाधव यांनी सांगितले. 

मात्र, प्रत्यक्षात १५००० कोटींच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात महाराष्ट्राचे ५६ टीएमसीचे पाणी-हक्क कायमस्वरूपी गुजरातला देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रासह दुष्काळी भागात पाणी वळविणाऱ्या कोणत्याही नदी-जोड प्रकल्पाला आर्थिक मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

केंद्राची अशी खेळी
दमणगंगा-पिंजाळ आणी नार-पार प्रकल्पाला १५००० कोटी देतो; त्याबदल्यात महाराष्ट्राच्या हक्काच्या ९२ पैकी ५६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा करार करा, अशी खेळी केंद्र-गुजरातमार्फत खेळली जात आहे. त्याला जलसंपदा विभागातील काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सुप्त पाठिंबा असल्याचाही आरोप जाधव यांनी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...