agriculture news in marathi, 57 percent of the villages in the state are still incomplete seven-twelve | Agrowon

राज्यातील ५७ टक्के गावांचे सात-बारा अद्याप अपूर्ण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात आतापर्यंत १९ हजार गावांमधील शेतकऱ्यांच्या सातबारांमधील दुरुस्तीची कामे पूर्ण करून संगणकीय सात-बारा तयार केले गेले आहेत; मात्र अजूनही राज्यातील ५७ टक्के गावांमधील सात-बारा अपूर्णावस्थेत आहेत.

शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन सातबारा मिळवून महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो रेंगाळला आहे. याला तलाठीवर्गाचा विरोध आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असतानादेखील शासनाने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

पुणे : राज्यात आतापर्यंत १९ हजार गावांमधील शेतकऱ्यांच्या सातबारांमधील दुरुस्तीची कामे पूर्ण करून संगणकीय सात-बारा तयार केले गेले आहेत; मात्र अजूनही राज्यातील ५७ टक्के गावांमधील सात-बारा अपूर्णावस्थेत आहेत.

शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन सातबारा मिळवून महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो रेंगाळला आहे. याला तलाठीवर्गाचा विरोध आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असतानादेखील शासनाने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याकडून संगणकीय सातबारा कामकाजाचा रोज आढावा घेतला जात आहे. गावातील तलाठी अडचण येताच ई-फेरफार कक्षाशी संपर्क साधत असल्याने कामकाजाला वेग आल्याचे दिसून येते.

केंद्र शासनाच्या ''डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम''चाच एक भाग म्हणून राज्यातील ४३ हजार ९४४ गावांमधील शेतकऱ्यांना संगणकीय सात-बारा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात आतापर्यंत ४३ टक्के गावांमधील उताऱ्यांची दुरुस्तीची कामे तलाठीवर्गाने मेहनतीने पूर्ण केली आहेत. त्यामुळे या गावांचे संगणकीय सात-बारा तयार झाले आहेत.

तसेच, बहुतेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवारात बसवलेल्या व्हेंडिंग मशिनमधूनदेखील शेतकऱ्याला डिजिटल सातबारा मिळू शकतो; मात्र अद्याप ५७ टक्के गावांमध्ये सात-बारा दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

सात-बारा दुरुस्तीची कामे पूर्ण झालेल्या गावांमधील तलाठी कार्यालयांतदेखील बिनचूक आणि संगणकीय सात-बारा मिळू शकतो; मात्र तो डिजिटल स्वरूपाचा नसून त्यावर तलाठ्याचा सही-शिक्का सध्या तरी घ्यावा लागेल, असेही महसूल विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

संगणकीय सात-बाराच्या नावाखाली शेतकऱ्यांना नुसताच प्रिंट केलेला सात-बारा दिला जात होता; मात्र प्रिंट सात-बारा देणे हा या प्रकल्पाचा हेतू नसून सातबारा ''बिनचूक'' आणि ''डिजिटल सिग्नेचर''चा हवा, असे बंधन घालण्यात आले आहे.

वाशीम, अकोला आघाडीवर
डिजिटल सातबारा देण्यासाठी साताबारा दुरुस्तीची कामे राज्यभर सुरू आहेत. त्यात वाशिम व अकोला जिल्ह्यात १०० टक्के कामे झाली आहेत. ३५८ तालुक्यांपैकी २९ तालुक्यांची कामे आटोपली असून, उर्वरित तालुक्यांमध्ये रेंगाळलेले काम रेटण्यासाठी राज्य शासनाची जोरदार धडपड सुरू आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट...नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना...
कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या...नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध...
विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅननागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम...
मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर...सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या...जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील...
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले...नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या...
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...