सोलापूर जिल्ह्यातील ५९५ लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

सोलापूर जिल्ह्यातील ५९५ लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागेवर विजयी होऊनही मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील दोन जिल्हा परिषद सदस्य आणि १३ पंचायत समिती सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

अक्कलकोट व सांगोला तालुक्‍याने अद्याप याबाबतची माहिती दिलेली नाही. त्यामुळे कदाचित या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. अपात्र होणाऱ्या दोन सदस्यांमध्ये बार्शी आणि माळशिरस तालुक्‍यातील प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. निवडणूक झाल्यानंतर मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणारे, मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर करणारे आणि अद्यापही प्रमाणपत्र सादर न करणारे, जातवैधता पडताळणी समितीने प्रमाणपत्र फेटाळलेले अशा विविध घटकांमध्ये वर्गीकरण झालेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची माहिती मागितली आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असलेले सदस्य

  ग्रामपंचायत  :  एक हजार  ५७०  पंचायत समिती :१३ (दोन तालुक्‍यांची माहिती बाकी)  जिल्हा परिषद : २ (दोन तालुक्‍यांची माहिती बाकी)   नगर परिषद/नगरपालिका :  १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com