agriculture news in marathi, 60 paise from revised paise in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी ६० पैसे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

अकोला : जिल्हा प्रशासनाला सुधारित पैसेवारीचे प्रस्ताव मिळाले असून ९९१ गावांपैकी ८२७ गावांची पैसेवारी ५० पेक्षाअधिक अाली अाहे. मूर्तिजापूर तालुक्यातील केवळ १६४ गावेच ५० पैशांच्या अात पैसेवारी असणारी अाहेत. जिल्ह्याची एकूण पैसेवारी ही ६० निघाली अाहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय अायुक्तांना सादर केला अाहे.

अकोला : जिल्हा प्रशासनाला सुधारित पैसेवारीचे प्रस्ताव मिळाले असून ९९१ गावांपैकी ८२७ गावांची पैसेवारी ५० पेक्षाअधिक अाली अाहे. मूर्तिजापूर तालुक्यातील केवळ १६४ गावेच ५० पैशांच्या अात पैसेवारी असणारी अाहेत. जिल्ह्याची एकूण पैसेवारी ही ६० निघाली अाहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय अायुक्तांना सादर केला अाहे.

यावर्षी जिल्हयात सरासरी इतका पाऊस झाला, तरी पावसातील खंड अधिक राहल्याने त्याचा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला अाहे. मूग, उडीद, सोयाबीन या तिन्ही पिकांची सरासरी उत्पादकता घटली. अाता शेतांमध्ये उभे असलेले कपाशी, तुरीचे पीकही किती उत्पादन देईल, हे निश्चित नाही. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी लागवड करायची की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी अाहेत.

शासकीय यंत्रणांनी नजर अंदाज पैसेवारीनंतर अाता सुधारित पैसेवारीचा अहवाल तयार केला. यानुसार अकोला तालुक्यातील १८२ गावांची ६२ पैसे, अकोटमधील १८५ गावांची ६८, बाळापूरमधील १०३ गावांची ५६, पातूरमधील ९४ गावांची ६२, मूर्तिजापूरमधील १६४ गावांची ४९, तर बार्शी टाकळी तालुक्यातील १५७  गावांची ५७ पैसे एवढी पैसेवारी निघाली अाहे.   
उत्पादनात मोठी घट अालेली असताना यंत्रणांची ही पैसेवारी नेमकी कुठल्या अाधारावर फुगली अाहे, याबाबत अाता शेतकऱ्यांमध्ये विचारणा होऊ लागली. पैसेवारी निश्चित करण्यासाठी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीचा अाधार यंत्रणांकडून घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात नुकताच काही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. परंतु त्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी कधीपासून होईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात अालेले नाही.

तालुकानिहाय पैसेवारी

अकोला  ६८
तेल्हारा   ६४
बाळापूर ५६
पातूर ६२
मूर्तिजापूर     ४९
बार्शी टाकळी ५७
एकूण  ६०

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...