खानदेशात ६० टक्के पेरण्या; यंदा कापसाची लागवड अधिक

खानदेशात ६० टक्के पेरण्या; यंदा कापसाची लागवड अधिक
खानदेशात ६० टक्के पेरण्या; यंदा कापसाची लागवड अधिक

जळगाव : खानदेशात पेरणीला गती आली असून, अंदाजित ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही भागाचा अपवाद वगळता सर्वत्र पेरणीलायक पाऊस झाल्याने चित्र चांगले आहे. खानदेशात कापसाची सर्वाधिक लागवड यंदाही असेल, असे संकेत मिळत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्‍टरवर, धुळ्यात चार लाख २० हजार तर जळगाव जिल्ह्यात सात लाख ६५ हजार हेक्‍टरवर खरीप हंगाम उभा राहणार आहे. यात मध्यंतरी हवा तसा पाऊस नसल्याने कापूस व सोयाबीनची पेरणी, लागवड होत नव्हती. आता मात्र काही भागात उडीद, मूग, कापूस, सोयाबीन, ज्वारी ही पिके चांगली अंकुरली आहेत.

जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख हेक्‍टर क्षेत्र कापसाखाली आहे. त्यापाठोपाठ तृणधान्य, कडधान्य आहे. सोयाबीनची पेरणी सुमारे २१ हजार हेक्‍टरवर झाली आहे. जळगाव, चोपडा तालुक्‍यांत काही भागांत सोयाबीनचा पेरा कमी पावसाने गेला आहे. हे क्षेत्र सुमारे ६०० ते ७०० हेक्‍टर असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.  

धुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली आहे. यापाठोपाठ तृणधान्य व कडधान्याची पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणी फक्त शिरपूर तालुक्‍यात अधिक आहे. सुमारे सहा हजार हेक्‍टरवर सोयाबीन असून, जवळपास ६५ हजार हेक्‍टरवर तृणधान्य आहे. एकूण ३ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत फक्त चार टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे ३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या मागील १० ते १२ दिवसात झाल्या आहेत. कापसाची सुमारे ६० हजार, सोयाबीनची पेरणी सुमारे साडेतीन हजार, आणि तृणधान्याची पेरणी जवळपास १८ हजार हेक्‍टरवर झाली आहे. खानदेशात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com