जळगावात शांततेत मतदान

जळगावात शांततेत मतदान
जळगावात शांततेत मतदान

जळगाव : जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १) सकाळी ७.३० वाजता मतदानास शांततेत सुरवात झाली. एकूण ४६९ मतदान केंद्रांद्वारे सायंकाळी ५.३० पर्यंत ६१ टक्के मतदान झाल्याचे समजले.

सकाळी ७.३० ते ९.३० यादरम्यान फक्त पाच टक्के मतदान झाले होते. मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. फक्त शिवाजीनगर, तांबापुरा भागातील केंद्रांमध्ये काहीशी गर्दी होती. परंतु दुपारी १२ नंतर मतदानाला वेग आला. मतदारांची ने-आण करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती.  ‘लक्ष्मी दर्शनाची संधी आहे... थोडे थांबा’, अशी चर्चाही काही भागात सुरू होती.

माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे यांच्या प्रभागात समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली.  मतदार याद्यांमधील क्रमांक शोधून देण्यासाठी काही उमेदवारांच्या एजंटनी ॲपची व्यवस्था केली. त्यावर माहिती पाहून ती मतदाराला दिली जात होती. संवेदनशील केंद्र असलेल्या शिवाजीनगर, तांबापुरा, हरिविठ्ठलनगर भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा नियुक्त केला होता. सकाळीच आमदार चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, नितीन लढ्ढा, आशा कोल्हे आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

पिंप्राळा, रामानंदनगर, महाबळ, नवी पेठ, जोशी पेठ, जुने जळगाव, दादावाडी, शिवाजीनगर भागातील केंद्रांवर दुपारी मतदारांच्या रांगा लागू लागल्या. मतमोजणी शुक्रवारी (ता. ३) होणार असून, भाजप व शिवसेनेत मुख्य लढत आहे. दोन्ही कॉंग्रेसला फारसे यश मिळणार नसल्याचे राजकीय वर्तुळातील जाणकारांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com