agriculture news in Marathi, 611 posts vacant in Jayakwadi Irrigation Department number two vacant | Agrowon

जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनमधील ६११ पदे रिक्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनअंतर्गत आकृती बंधानुसार मंजूर पदांची संख्या ८४० आहे. परंतु सध्या २२९ पदे कार्यरत असून, ६११ पदे म्हणेजच ७२ टक्के पदे रिक्त आहेत. उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्याची ३ पदे, शाखा अभियंत्याची २१ पदे तर कालवा निरीक्षकांची २३६ पदे, कालावा चौकीदारांची ५८ पदे रिक्त आहे. सर्वच कर्मचारी संवर्गातील पदे मोठ्या संख्यने रिक्त आहेत.

परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनअंतर्गत आकृती बंधानुसार मंजूर पदांची संख्या ८४० आहे. परंतु सध्या २२९ पदे कार्यरत असून, ६११ पदे म्हणेजच ७२ टक्के पदे रिक्त आहेत. उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्याची ३ पदे, शाखा अभियंत्याची २१ पदे तर कालवा निरीक्षकांची २३६ पदे, कालावा चौकीदारांची ५८ पदे रिक्त आहे. सर्वच कर्मचारी संवर्गातील पदे मोठ्या संख्यने रिक्त आहेत. त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या सिंचन प्रणालीचे व्यवस्थापन, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी वसुली आदी कामासाठी मनुष्यबळ तोकडे पडत त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे.

परभणी येथील जायकवाडी विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातर्फे पैठण येथील जायकवाडी धरणाचा डावा कालवा तसेच जिल्ह्यातील अन्य काही प्रकल्पांचे व्यवस्थापन केले जाते. 

या कार्यालयाच्या आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांची संख्या ८४० आहे. मंजूर पदांमध्ये कार्यकारी अभियंत्याचे १ पद, उपकार्यकारी अभियंत्याचे १ पद, उपविभागीय अधिकारी-अभियंत्यांची ६ पदे, शाखा अभियंत्याची ४३ पदे, प्रथम लिपिक, विभागीय लेखपाल, भांडारपाल, सहायक भांडारपाल, आरेखक, वरिष्ठ दफ्तर कारकून, नाईक यांची प्रत्येकी १ पदे, वरिष्ठ लिपिकांची ११ पदे, कनिष्ठ लिपिकांची १६ पदे, टंकलेखकांची ६ पदे, स्थापत्य आभियंता सहायकांची ३३ पदे, दप्तर कारकुनांची ८१ पदे, कालवा निरीक्षकांची २६४ पदे, मोजणीदारांची १३२ पदे, संदेशकांची ३३ पदे, वाहन चालकांची ७ पदे, शिपायांची ५० पदे, चौकीदाराची ७ पदे, कालवा चौकीदाराची ९९ पदे, कालवा टपालीची ३३ पदे मंजूर आहेत. 

यापैकी सध्या केवळ २२९ पदे कार्यरत आहेत. उपकार्यकारी अभियंत्याचे एक, उपविभागीय अभियंत्यांची ३ पदे, शाखा अभियंत्याची २१ पदे, विभागीय लेखपाल, सहायक भांडारपाल, आरेखक, नाईक यांचे प्रत्येकी एक पद, वरिष्ठ लिपिकाची ५ पदे, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, वाहन चालक यांची प्रत्येकी ३ पदे, अनुरेखकाची ४ पदे, अभियांत्रिकी सहायकाची २३ पदे, दप्तर कारकूनाची ५४ पदे, कालवा निरीक्षकांची २३६ पदे, मोजणीदारांची १०१ पदे, संदेशकांची ३३ पदे, शिपायाची ३४ पदे, कालवा चौकीदारांची ५८ पदे, कालवा टपालीची २४ पदे असे एकूण ६११ पदे रिक्त आहेत. 
 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...