agriculture news in marathi, 636 farmer suicide in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ९ महिन्यात ६३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जानेवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ३९६ आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र तर १८१ प्रकरणे मदतीस अपात्र ठरली. ३९३ प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आली असून, ५९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जानेवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ३९६ आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र तर १८१ प्रकरणे मदतीस अपात्र ठरली. ३९३ प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आली असून, ५९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नापिकी, कर्जबाजारीपणा आदींमधून आलेल्या विवंचनेतून १ जानेवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील ६३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३, जालना ६२, परभणी ९०, हिंगोली ४६, नांदेड ६४, बीड १२५, लातूर ५६ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या एकूण प्रकरणांपैकी ३९६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी पात्र तर १८१ प्रकरणं अपात्र ठरली आहेत. मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील ५९, जालना ५१, परभणी ५६, हिंगोली २४, नांदेड ३३, बीड १०६, लातूर ३४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. 

शासनाच्या मदतीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २०, जालना ५, परभणी २३, हिंगोली १३, नांदेड २३, बीड १२, लातूर १९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे.

चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील १४, जालना ६, परभणी ११, हिंगोली ९, नांदेड ५, बीड ७, लातूर ३ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं वगळता शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरलेल्या  ३९३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात शासनाकडून ३९३ लाखांची मदत देण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यात  ७५ आत्महत्या
कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतीमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र नाशिक जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७५ पर्यंत पोचली आहे. मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील मोठा भाऊ आप्पा शेलार (३५), दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील संदीप अशोक कदम (३०), अशी अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. शेलार यांनी गळफास घेऊन तर पालखेड बंधारा येथे राहणाऱ्या कदम यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...