नाशिक जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'

नाशिक जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'
नाशिक जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'

नाशिक :  राज्य शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना' अाणली हाेती. या याेजनेमधून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला अाहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अाणि इतर बॅँकांना कर्जमाफी, प्राेत्साहन अनुदान यासाठी ६८६ काेटी ६४ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मिळाला अाहे. यापैकी सर्वाधिक ५८० काेटी ५४ लाख ६३ हजारांचा निधी एकट्या जिल्हा बँकेला मिळाला अाहे. बँकेच्या १ लाख १४ हजार ६९१ खातेदारांना अात्तापर्यंत या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे समाेर अाले अाहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या याेजनेचा लाभ पाेचेल, असे स्पष्ट केले हाेते. यामुळेच या याेजनेला अात्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढही दिली गेल्याचे मानले जाते. या याेजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, २५ हजारांपर्यंतचे प्राेत्साहन अनुदान अाणि दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाख रुपयांचे कर्ज माफ अशा तीन प्रकारांत शेतकऱ्यांना लाभ मिळत अाहे.

मालेगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९० काेटी ९५ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ ३५ हजार ९६८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर सटाणा तालुक्यातील २५ हजार ९३ शेतकऱ्यांना ७३ काेटी ७५५ लाखांचा तर येवला तालुक्यातील २२ हजार ४५८ शेतकऱ्यांना ५५ काेटी २३ लाख ९८ हजार रुपयांचा लाभ मिळाला अाहे. अादिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या पेठ तालुक्यात केवळ ३ हजार ९१५ शेतकऱ्यांना ५ काेटी २८ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. लाभाची रक्कम सरकारने लाभार्थींच्या बॅंक खात्यात वर्ग केलेली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com