agriculture news in marathi, | Agrowon

कृषिपंपधारकांची बिले तपासून दुरुस्त होणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई : राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारक वीजग्राहकांची वीजबिले १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. त्यानंतर अचूक वीजबिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येइल.

मुंबई : राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारक वीजग्राहकांची वीजबिले १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. त्यानंतर अचूक वीजबिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येइल. तसेच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांची वीजबिले १.१६ रुपये प्रति युनिट या दराने भरून घेतली जातील व या सर्व उच्च दाब वीजग्राहकांच्या बिलांमधील थकबाकी १५ ऑगस्टपर्यंत निकालात काढण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी इरिगेशन फेडरेशनच्या धडक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने शेतकरी वीजग्राहकांचा धडक मोर्चा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे व शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. शिष्टमंडळामध्ये एन. डी. पाटील यांच्यासह प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील व अरुण लाड हे सहभागी होते. या बैठकीमध्ये व चर्चेमध्ये आ. गणपतराव देशमुख, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर आदी आमदार सहभागी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दिवाकर रावते, चंद्रकातदादा पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंग, संजीव कुमार, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

शेती पंप वीजबिले तपासून दुरुस्त करण्याचा निर्णय झाल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी वीजग्राहकांची बिले किमान ४५% ते ५०% कमी होतील, असा दावा प्रताप होगाडे यांनी केला आहे. तसेच गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३ वेळा शेतीपंप वीज दरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वीजग्राहकांच्या दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे शासकीय सवलतीचे वीजदर पुढील कालावधीसाठी १५ ऑगस्टपर्यंत नव्याने निर्धारीत करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय मोर्चामध्ये राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांबरोबरच अन्य वैयक्तिक शेती पंप धारक मोठ्या संख्येने सहभागी होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इ. विविध पक्ष व संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० हजार हून अधिक शेतकरी आझाद मैदानावर सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...