agriculture news in marathi, 70 thousand crore rupees edible oil imported yearly in India | Agrowon

भारतात दर वर्षी ७० हजार कोटींचे खाद्यतेल आयात
वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

हैदराबाद : देशात तेलबीया आणि खाद्यतेल उत्पादन कमी होत असल्यामुळे जवळपास ७० टक्के आयात करावी लागते. त्यामुळे देशात दर वर्षी ७० हजार कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात केली जाते, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. 

हैदराबाद : देशात तेलबीया आणि खाद्यतेल उत्पादन कमी होत असल्यामुळे जवळपास ७० टक्के आयात करावी लागते. त्यामुळे देशात दर वर्षी ७० हजार कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात केली जाते, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. 

येथे कृषी विभागाच्या तेलबीया विभागाने आयोजित केलेल्या ‘२०२२ पर्यंत खाद्यतेल उत्पादन आराखडा’ दोनदिवसीय चर्चासत्राचे उद्‌घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.  मंत्री शेखावत म्हणाले, की भारतात मागणीच्या प्रमाणात खाद्यतेलाचे उत्पादन होत नाही. तेलबीयांची लागवड क्षेत्र कमी त्यातच उत्पादकताही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याने देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवतो. सध्या आपण बऱ्याच उत्पादनात आत्मनिर्भर आहोत. दूध, मटन, फलोत्पादन, भात आणि समुद्रीय उत्पादनात आपण मोठे उत्पादक म्हणून जगासमोर उभे आहोत. तसेच, सरकारने आखलेल्या उत्पादन कार्यक्रमामुळे देशात कडधान्यांचे विक्रमी उत्पादन होऊन आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. 

‘‘सध्या भारताला मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करावी लागत आहे. परंतु ही आयात कमी करून देशातील शेतकऱ्यांना तेलबीया उत्पादनासाठी प्रोत्सा.िहत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी जलद्‌गतीने योजना आखून २०२२ पर्यंत खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णता यावी, यासाठी योजना आखण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दप्पट करण्यासाठी आणि खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णता यावी, यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरच प्राथमिक प्रक्रिया केंद्रे सुरू करावी लागणार आहे,’’ असेही मंत्री शेखावत म्हणाले.      

या वेळी खाद्यतेल, अवजारे उत्पादक, प्रक्रियादार, विपणन कंपन्या, विकसक कंपन्या, मूल्यवर्धन एजन्सीज आणि संबंध कंपन्यांची दालने लावण्यात आली होती. चर्चासत्रात वेगवेगळ्या संस्थांमधील जवळपास ५०० तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रात २०२२ पर्यंत देशाला खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठीच्या विविध घटक, धोरणे, सराव, तंत्रज्ञान आदी घटकांवर सादरीकरण झाले. देशातील शेतकऱ्यांना तेलबीया उत्पादनाकडे आकर्षीत करून उत्पादनवाढीसह त्यांना प्रक्रिया सुविधा देऊन त्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...