agriculture news in marathi, 700 villeages affected by bollworm, pune, maharashtra | Agrowon

राज्यातील सातशे गावांमध्ये बोंड अळीचा धुडगूस : कृषी विभाग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे : कपाशीतील बोंड अळीचे संकट आता ७०० गावांपर्यंत पसरले आहे. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी स्वतः कृषी आयुक्त रोज आढावा घेत आहे. अनेक गावांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनावश्यकपणे संजीवकांचा वापर करण्यास भाग पाडले जात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पुणे : कपाशीतील बोंड अळीचे संकट आता ७०० गावांपर्यंत पसरले आहे. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी स्वतः कृषी आयुक्त रोज आढावा घेत आहे. अनेक गावांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनावश्यकपणे संजीवकांचा वापर करण्यास भाग पाडले जात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात खरीप पिकाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे आणि जामदार कायिक वाढीमुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. बोंड अळीचे संकट वाढत आहे. राज्यातील २१ हजार गावांमध्ये ४२ लाख हेक्टरवर कापूस घेतला जातो. यंदा आतापर्यंत ७०० गावांमध्ये बोंड अळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.  

बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडल्यानंतर अशा जिल्ह्यांमध्ये आता जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी एकटा कृषी विभाग आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोंड अळी नियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे प्रभावी काम अनेक भागात सुरू झाल्याचे दिसत नसल्याचे एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, बोंड अळीचे संकट वाढलेले असताना काही भागात कपाशी तसेच इतर पिकांवर संजीवकांच्या वापरामुळे किडी वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुळात कोणत्याही प्रकारची संजिवके, हार्मोन्स, टॉनिकची शिफारस पिकांसाठी नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करून संजीवके विकली जात असल्याने उलटा परिणाम पिकावर होतो आहे. टॉनिकचा वापर केल्याने पिकाची केवळ कायिक वाढ होते. त्यामुळे फक्त पिकाचा लुसलुशीतपणा वाढतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसतो. किडी वाढण्यास कारणीभूत असलेल्या कारणांपैकी या पिकांची संजीवकांमुळे होत असलेली कायिक वाढ व लुसलुशीतपणा हे देखील आहे. शेतकऱ्यांना या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवरील खर्च वाढतो, असा दावा कृषी विभागाने केलेला आहे.

संप्रेरकांच्या परिणामाचे ठोस निष्कर्ष नाहीत
आकर्षक प्रचार, सुबक पॅकिंग, कंपनी व विक्रेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यामुळे संप्रेरके, संजीवके, हार्मोन्सचा वापर करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले जाते. अशा वाढ संप्रेरकाच्या प्रत्यक्ष पीक उत्पादनवाढीसाठी नेमका किती परिणाम होतो. याबाबत ठोस निष्कर्ष नाहीत. कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रांनी देखील तशा शिफारशी केलेल्या नाहीत, असा दावा कृषी आयुक्तालयाने केला आहे.

राज्यात विकल्या जात असलेल्या या औषधांना व रसायनांना केंद्र तसेच राज्य शासनाने कुठेही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॉनिक अजिबात वापरू नये, असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...