agriculture news in marathi, 71 candidates filed nomination for Loksabha in state | Agrowon

लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवारांचे अर्ज
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मार्च 2019

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघापैकी १५ मतदारसंघात एकूण ४८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत १६ मतदारसंघात ७१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघापैकी १५ मतदारसंघात एकूण ४८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत १६ मतदारसंघात ७१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

शुक्रवारी लोकसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरवातीच्या दिवसापासून नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील ८- वर्धा लोकसभा मतदारसंघात ५ (६), ९- रामटेक मतदारसंघ २ (२), १०- नागपूर मतदारसंघ ९ (१२), ११- भंडारा- गोंदिया मतदारसंघ ४ (६), १२- गडचिरोली- चिमूर मतदारसंघ ४ (४), १३- चंद्रपूर मतदारसंघात १ (२) आणि १४- यवतमाळ- वाशीम मतदारसंघात ७ (११) उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात आतापर्यंत नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ५- बुलढाणा मतदार संघ १ (१), ६- अकोला १ (२), ७- अमरावती १ (५), १५- हिंगोली २ (२), १६- नांदेड ७ (११), १७- परभणी १(३), ३९- बीड १ (१), ४०- उस्मानाबाद मतदारसंघात आज रोजी तसेच आजपर्यंत २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ४२- सोलापूर मतदारसंघात शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसले तरी आजपर्यंत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...