agriculture news in marathi, 71% crop loan distribution in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात ७१ टक्के पीककर्जाचे वितरण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६५ कोटी १५ लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३१ सप्टेंबरअखेर एक हजार १६८ कोटी ७९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ७१ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ७६४ कोटी ४६ लाख रुपये वाटप केले आहे. खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकाच्या दुर्लक्षामुळे उद्दिष्टांपैकी २९ टक्के पीककर्ज वितरण होऊ शकलेले नाही.

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६५ कोटी १५ लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३१ सप्टेंबरअखेर एक हजार १६८ कोटी ७९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ७१ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ७६४ कोटी ४६ लाख रुपये वाटप केले आहे. खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकाच्या दुर्लक्षामुळे उद्दिष्टांपैकी २९ टक्के पीककर्ज वितरण होऊ शकलेले नाही.

खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक हजार ६५ कोटी १५ लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरअखेर खरीप पेरण्यांचा कालावधी असतो. मुदतीत उद्दिष्टाच्या ७१ टक्के वाटप झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते.

जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत. पीक कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेस या हंगामात ८१० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ७६४.४६ कोटींचे वाटप केले असून, ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्रला १४१.४२ कोटींचे उद्दिष्टापैकी ८८.०३ कोटींचे म्हणजेच ६२ टक्के कर्जवाटप केले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १५९.९० कोटींच्या उद्दिष्टापैकी ७०.७६ कोटींचे म्हणजेच ४४ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. आयडीबीय बॅंकेस ८८.८३ कोटीच्या उद्दिष्टापैकी ८६.१९ कोटींचे म्हणजेच ९७ टक्के वितरण करण्यात आले आहेत. बॅंक ऑफ इंडियाने १४२.१४ कोटींच्या उद्दिष्टपैकी २६.४५ कोटींचे म्हणजेच १९ टक्के वितरण करण्यात आले आहे.

राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका कारवाई होणार का?
जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जवाटप आघाडी घेतली आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका व खासगी बँकांकडून पीककर्ज वितरण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसाठी ६६४ कोटी २७ लाख रुपयचे उद्दिष्ट देण्यात आले होते, या बॅंकाकडून ३४३ कोटी ३१ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ५२ टक्के वितरण करण्यात आले आहे. खासगी बॅंकासाठी १७३ कोटी ३० लाख या बॅंकाना उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ५८.५२ कोटीचे म्हणजेच ३४ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपाची सप्टेंबरअखेर मुदत संपली आहे. ज्या बॅंका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बॅंकावर करवाई केली जाईल, अशा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. ज्या बँकानी उद्दिष्टांच्या ७५ टक्केही कर्ज वितरण न करणाऱ्या बॅंकावर तरी किमान करवाई केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...