agriculture news in marathi - 7/12 mistake correction | Agrowon

सातबारावरील कालबाह्य नोंदीतून करून घ्या सुटका- प्रांताधिकारी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

देऊर, जि. धुळे : स्वातंत्र्यानंतरही सात-बारावरील इतर हक्कांत असलेले तगाई कर्ज, बंडिंग बोजे, बेकायदेशीर व्यवहार, झाडांच्या नोंदी, नजरगहाण, विहिरी, कुळे आदी शासनाने सूचना देऊनही तशाच राहिल्या आहेत. या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली. शेतकऱ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

देऊर, जि. धुळे : स्वातंत्र्यानंतरही सात-बारावरील इतर हक्कांत असलेले तगाई कर्ज, बंडिंग बोजे, बेकायदेशीर व्यवहार, झाडांच्या नोंदी, नजरगहाण, विहिरी, कुळे आदी शासनाने सूचना देऊनही तशाच राहिल्या आहेत. या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली. शेतकऱ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

जुनाट नोंदीमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. या अनावश्‍यक नोंदीतील तगाई कर्ज, बंडिंग बोजे, बेकायदेशीर व्यवहार, झाडांच्या नोंदी, नजरगहाण या नोंदी कमी करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी या सर्व नोंदी कमी करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज द्यावा व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. बोजे कमी झाल्याचे निर्बोज सात-बारा उताऱ्याचे वाटप केले जाणार आहे. 

तगाई ः शेतजमीन सुधारण्यासाठी विहीर तगाई, बैलतगाई, चारा तगाई, ऑइल इंजिन तगाई, घर बांधणे तगाई, जळीत तगाई बी-बियाणे तगाई (सावकारी कर्ज), खावटी तगाईचा समावेश आहे. 

बंडिंग बोजे ः शेतीला बांध घालणे, सपाटीकरण करणे यासाठी मृद्‌संधारण विभागाने बांध घालण्याचा खर्च शेतकऱ्याकडून वसुलीसाठी बोजा टाकला आहे. 
बेकायदेशीर व्यवहार : तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९४७ नुसार गावी गटस्कीमची अंमलबजावणी सुरू असताना खरेदी, विक्री व्यवहार बेकायदेशीर ठरविले होते. १९६१ ते ७० कालावधीत या सात-बारावर नोंदी आहेत. 

झाडाच्या नोंदी ः सद्य:स्थितीत कुसुंबा गावात आंब्यांची झाडे नाहीत. आमराई नामशेष झाली आहे. मात्र इतर हक्‍कात झाडांचे प्रकार व हिस्सा राशी संबंधीच्या नोंदणी आजही कायम आहेत. 

तलाठी व मंडलाधिकारी मोहीम स्वरूपात पुढील दोन महिन्यांत सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कांत असलेले अनावश्‍यक शेरे-नोंदी कमी करण्याची कार्यवाही करणार आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याकडे करावा. 
- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...